Vish Yog : आज कुंभ राशीत शनि चंद्र युतीमुळे विष योग! `या` राशींच्या आयुष्यात कोसळणार संकटांचा डोंगर
Vish Yog 2023 Effect : आज कुंभ राशीत शनि आणि चंद्राची भेट होणार आहे. त्यामुळे विष योग तयार झाला असून पुढील अडीच दिवस काही जाचकांवर संकट कोसळणार आहे.
Vish Yog 2023 Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्र यांचं गोचर होतं तेव्हा काही शुभ तर काही अशुभ योग तयार होतात. पंचांगानुसार आज रक्षाबंधनाच्या दिवशी अतिशय विनाशकारी योग तयार झाला आहे. चंद्र आज मकर राशीतून कुंभ राशीत असणार आहे. कुंभ राशीत न्यायदेवा शनिदेव विराजमान आहे. अशात कुंभ राशीत चंद्र आणि शनिदेवाची भेट (Shani Chandra Yuti 2023) होणार आहे. यातून विष योग तयार झाला आहे. या विनाषकारी योगामुळे चार राशींच्या आयुष्यात अडीच दिवस भूकंप येणार आहे, असं ज्योतिषशास्त्र अभ्यासकांचं म्हणं आहे. (shani chandra yuti making Vish Yoga at kumbh today 30 August Crisis will fall on these zodiac signs)
वृषभ (Taurus)
शनि आणि चंद्राच्या युतीमुळे या राशींच्या लोकांना अडीच दिवस कठीण असणार आहे. व्यावसायिकांसाठी व्यापाऱ्यात वाईट परिणाम होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं संबंध बिघडण्याची शक्यता आहे. तुम्हाला आर्थिक फटका बसणार आहे.
कर्क (Cancer)
शनि चंद्राच्या युतीमुळे तयार झालेल्या विष योगाचा या राशीला फटका बसणार आहे. या लोकांनी काळजी घ्यावी यांच्यासोबत अपघात किंवा वाईट घटना घडण्याची भीती आहे. या लोकांना अचानक संकटांना सामना करावा लागणार आहे. आर्थिक स्थिती बिघडणार आहे.
सिंह (Leo)
शनि आणि चंद्राच्या युतीमुळे तयार झालेल्या विष योग सिंह राशीच्या आयुष्यात वादळ आणणार आहे. या लोकांच्या वैवाहिक जीवनात संकट येणार आहे. आर्थिक स्थिती डबघाईला येणार आहे. व्यवसायात मोठं नुकसान होणार आहे. पुढील अडीच दिवस संकट तुमची वाट पाहत आहेत.
कुंभ (Aquarius)
शनि आणि चंद्राच्या युतीमुळे तयार झालेल्या विष योग कुंभ राशीच्या आयुष्यात नकारात्मक परिणाम करणार आहे. मानसिक आरोग्यावर परिणाम होणार आहे. भविष्याची चिंता आणि तणावामुळे तुम्ही नैराश्याने ग्रासलेले असाल. हातातील काम होण्यास उगाचच वेळ लागणार आहे. वैवाहिक जीवनात संकट येणार आहे.
हेसुद्धा वाचा - Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाला 200 वर्षांनंतर शनि गुरु वक्री, तर 700 वर्षानंतर 5 महायोग! 'या' राशींची भावंड होणार मालामाल
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)