Shani Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाचे विशेष स्थान असून शनिदेवाला पापी आणि क्रूर ग्रह मानले जाते. जेव्हा शनि अशुभ स्थितीत असतो तेव्हा तो जाचकाला अनेक प्रकारच्या संकटात टाकतो. पण असे नाही की शनिदेव केवळ अशुभ फळ देतात. पण जेव्हा शनिदेव कुंडलीत चांगल्या स्थितीत असतो तो जाचकाला मालामाल करतो. या वर्षी शनिदेव स्वगृहात म्हणजे कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे अशा स्थितीत शनिदेव 31 डिसेंबर 2024 या राशींवर पैशांचा पाऊस पाडणार आहे. (Shani Gochar Till 31st December 2024 the grace of Shani on these zodiac signs will bring rain of money to the house)


मेष रास (Aries Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. मालमत्तेतून उत्पन्नाचे साधन वाढणार आहे. मित्रांकडून सहकार्य लाभणार आहे. सहलीला बाहेर जाणार आहात. कुटुंबात धार्मिक कार्ये होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदी असणार आहात. आर्थिक बाजू मजबूत होणार आहे. यावेळी नवीन काम करणे शुभ ठरणार आहे. 


वृषभ रास (Taurus Zodiac) 


तुमचा आत्मविश्वास वाढणार असून नोकरीत कामाचा ताण कमी होणार आहे. व्यवसायात विस्तार होणार आहे. वडिलांचे सहकार्य लाभणार आहे. आर्थिक लाभ होणार असून आर्थिक बाजू मजबूत होणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ शुभ असणार आहे. यावेळी तुम्ही नवीन कामाचा प्रारंभ करु शकणार आहात. नवीन कामातून लाभच लाभ होणार आहे. 


मिथुन रास (Gemini Zodiac)


नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. कामाची व्याप्ती वाढणार आहे. कुटुंबात धार्मिक कार्ये संपन्न होणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. आत्मविश्वासाने परिपूर्ण असणार आहात. नोकरी-व्यवसायासाठी काळ शुभ असणार आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळणार आहे. मित्रांसोबत वेळ व्यतित करणार आहात. शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नसणार आहे. 
 


सिंह रास (Leo Zodiac) 


कुटुंबात धार्मिक कार्ये होणार आहे. मित्राच्या मदतीने उत्पन्न वाढवण्याचे साधन निर्माण होणार आहे. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळणार आहे. मानसिक शांतता लाभणार आहे. तुमची आर्थिक बाजू मजबूत होणार आङे.
वैवाहिक जीवन सुख समृद्धी येणार आहे. 


कन्या रास (Virgo Zodiac)   


तुम्ही तुमच्या शत्रूंवर वर्चस्व गाजवणार आहात. मानसिक शांतीचा अनुभव मिळणार आहे. तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांना यशासाठी कठोर परिश्रम करावे लागणार आहे. वैवाहिक जीवनात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)