Shadashtak Yog In Aquarius :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रहांपैकी शनि आणि राहू हे क्रूर ग्रह मानले जातात. शनि आणि राहूचं नाव घेतल्यावर भल्याभल्या माणसाला घाम फुटतो. शनि आणि राहुची दशा सुरु असलेल्या लोकांना अनेक संकटांच्या सामना करावा लागतो. अशात यावर्षी शनि आणि राहू अतिशय घातक असा योग निर्माण करणार आहे. केतू हा पापी ग्रह वर्षभर मीन राशीत असणार आहे. तर कुंभ रासीत शनि विराजमान आहे. अशा स्थितीत कुंडलीत कुंभ रास आठव्या भावात असणार आहे. शनि आणि केतूमुळे षडाष्टक धोकादायक योग निर्माण होणार आहे. या अशुभ योगांच्या निर्मितीमुळे अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात एकामागोमाग संकट येणार आहे. (shani ketu 2024 Dangerous Shadashtak yoga will be created in Aquarius There will be financial loss for these zodiac sign)


वृषभ रास (Taurus Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केतू आणि शनीच्या षडाष्टक योगाचा या राशीच्या लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम दिसून येणार आहे. या लोकांनी गाडी चालवताना थोडी काळजी घ्यावी अन्यथा अपघाताची शक्यता आहे. यासोबतच मानसिक तणावाचाही सामना या लोकांना करावा लागणार आहे. जर तुम्ही परदेशात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय व्यवहार करु नका. कारण तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. यासोबतच नात्यांबाबत थोडे सावध राहा अन्यथा त्यात मतभेद होऊन दुरावा निर्माण होईल. 


कुंभ रास (Aquarius Zodiac) 


या राशीत केतू आठव्या भावात आणि शनि चढत्या घरात स्थित असणार आहे. अशा स्थितीत षडाष्टक योग या राशीच्या लोकांसाठी अडचणीचा ठरणार आहे. तुम्ही पैसे वाचवण्यात अयशस्वी होणार आहात. यासोबतच तुमच्या रागावर थोडं नियंत्रण ठेवा, कारण यामुळे तुम्हाला मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. पैशाच्या बाबतीत थोडे सावध राहणे तुम्हाला संकटापासून वाचवेल. कोणताही व्यवहार विचारपूर्वक करा, कारण आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. यासोबतच विनाकारण कोणाशीही वाद घालू नका. 


मीन रास  (Pisces Zodiac)  


केतू आणि शनीचा षडाष्टक योग या राशीच्या लोकांसाठी थोडा त्रासदायक ठरणार आहे. तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल थोडे चिंतेत राहावं लागणार आहे. कायदेशीर बाबींपासून दूर राहणे बरं पडेल. कारण कायदेशीर प्रक्रियेत तुम्ही अडकू शकता. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. यासोबतच कुटुंबात सामंजस्य ठेवा, कारण काही कारणाने भांडणे होण्याची भीती आहे. यामुळे घरातील वातावरण अशांत होऊन तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागणार आहे.  


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)