मुंबई : शनी आणि साडेसाती संपावी त्यामुळे येणारे अडथळे दूर व्हावेत असं प्रत्येकाला वाटतं. मात्र काही लोक जन्मताच आपल्यासोबत उत्तम भाग्याची साथ घेऊन येतात. त्यांचा पायगुण चांगला असल्याचंही म्हटलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन राशीचे लोत खूप पैसे कमवताता आणि त्यासोबत त्यांची एक वेगळी ओळखही निर्माण करतात. यासाठी त्यांच्यावर शनीची उत्तम कृपादृष्टी असते असंही म्हटलं जातं. कोणत्या तीन राशी आहेत ज्यांच्यावर शनी प्रसन्न असतो आज त्याबद्दल जाणून घेऊया.


तुळ : शनी देवाची सगळ्यात प्रिय राशी म्हणून तुळकडे पाहिलं दातं. या राशीवर कायम शनीदेवाची कृपादृष्टी असते. या राशीचे लोक मेहनती आणि प्रामाणिक असतात. आपल्या आयुष्यात हे लोक चांगल्या स्थानावर पोहोचतात. आपल्या जीवनातील ध्येय गाठण्यासाठी ते कायम प्रयत्न करतात.


कुंभ : या राशीचा स्वामीच शनी आहे. त्यामुळे या राशीवर शनीदेव मेहरबान असतो. या राशीचे लोक मेहनती असतात. सर्वांना मदत करणं हा त्यांचा स्वभाव असतो. एक उत्तम लीडर आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणं हा त्यांचा स्वभाव असतो. आपलं नाव कमवण्यात हे कुठेही कच खात नाहीत. 


मकर : या राशीचा स्वामी शनी ग्रह आहे. त्यांना जे करायचं असतं ते योग्य मार्गानं मिळवतात हा त्यांचा स्वभाव आहे. या राशीच्या लोकांवर शनीची कृपा कायम राहाते. त्यांना सुखं समृद्धी आणि समाधान मिळतं. या राशीचे लोक खूप प्रगती करतात. 


Disclaimer : इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.