2023 Shani Nakshatra Gochar 2023 in marathi : ज्योतिषशास्त्रात ग्रह तारे, आणि कुंडली याला फार महत्त्व आहे. या ग्रह तारे आणि कुंडलीतील त्यांचं स्थान आपल्या भविष्याची गणित ठरवतात. मार्च महिना म्हटलं तर 3 मार्चला आमलकी एकादशी आणि होळी हे सण साजरा करण्यात येणार आहे. होळीनंतर शनी नक्षत्राचं संक्रमण होणार आहे. यामुळे सर्व राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येणार आहे. पण काही राशींसाठी शनी गोचर सगळ्यात जास्त भाग्यशाली होणार आहे. न्यायाची देवता शनि 14 मार्च 2023 रोजी नक्षत्र बदलून शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींना धनलाभ होणार आहे. (Shani Nakshatra Gochar 2023 Saturn Transit Dates and 3 zodiac people get money in marathi)


मेष (Aries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 या राशीच्या लोकांसाठी शनी गोचर शुभ ठरणार आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. उद्योगपतींसाठी हा शुभ काळ असून त्यांना आर्थिक फायदा होणार आहे. 


वृषभ (Taurus)


या राशी लोकांसाठी शनी गोचर भाग्यशाली ठरणार आहे. या राशीच्या लोकांच्या कुंडलीत राजयोग येणार आहे. त्यामुळे या लोकांच्या कामाला यश मिळणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांचे प्रोमोशन आणि पगार वाढ होणार आहे. आईच्या आरोग्याची चिंता मिटेल. जोडीदारासोबत आनंदात वेळ व्यतीत कराल. या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित मालमत्तेतून मोठ्या धनलाभ होणार आहे. 


मिथुन (Gemini)


परदेशात नोकरी करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना सुर्वण सुंधी मिळणार आहे. या राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने हा सगळ्यात शुभ काळ असणार आहे. या राशीच्या लोकांनी मेहनतीला प्राधान्य दिलं पाहिजे. 


सिंह  (Leo)


या राशीच्या लोकांसाठी शनी गोचर सर्वात फलदायी ठरणार आहे. ज्या लोकांवर कर्जाचं डोंगर असेल त्यांची चिंता मिटणार आहे. कारण या काळात या राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. उद्योगपतींना व्यवसायात फायदा होणार आहे. नोकरदार वर्गासाठीही ही सर्वात चांगला काळ ठरणार आहे. त्यांना नोकरीच्या अनेक संधी मिळणार आहेत. 


मकर  (Capricorn)


या राशीच्या लोकांसाठीही शनी गोचर भाग्यशाली ठरणार आहे. कुटुंबामध्ये आनंद राहिल. जोडीदारासोबत प्रेम वाढणार. प्रेमविवाह इच्छूकांच्या इच्छा पूर्ण होतील. या राशीच्या लोकांचे प्रमोशन आणि पगारवाढ होणार आहे. परदेशात प्रवास घडणार आहे. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)