Shani Sadesati Gochar 2023 Sadesati: ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं. शनिदेव (Shani) आपल्या कर्मानुसार फळं देतात. मात्र शनिचा प्रभाव असताना अनेक यातना भोगाव्या लागतात. म्हणून शनि आपल्या राशीत येणार म्हटलं की भल्याभल्यांना घाम फुटतो. शनिदेवांना एका राशीतून दुसऱ्या राशीत (Shani Gochar) प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे तीन राशींना साडेसाती आणि दोन राशींना अडीचकी प्रभाव सहन करावा लागतो. पुढच्या वर्षी शनिदेव म्हणजेच 17 जानेवारी 2023 रोजी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे पाच राशींवर शनिदेवांचा प्रभाव दूर होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

17 जानेवारी 2023 रोजी तूळ आणि मिथुन राशीवरील शनि अडीचकीचा प्रभाव दूर होईल. त्याचबरोबर धनु राशीला शनि साडेसातीतून मुक्ती मिळेल. 3 राशींवरील शनिचा प्रभाव संपताच या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होतील. अडकलेली कामं पुन्हा सुरू होतील. संपत्तीसोबत समाजात प्रतिष्ठा वाढेल. चांगल्या नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. व्यवसायात चांगला फायदा होईल आणि आरोग्यात सुधारणा होईल.


बकरीनं मंदिरात गुडघे टेकून घेतला आशीर्वाद, Video Social मीडियावर व्हायरल


शनि कुंभ राशीत प्रवेश करताच मीन राशीवर साडेसातीचं पहिला टप्पा सुरु होईल. 2023 पासून कुंभ, मकर आणि मीन राशीला शनिची साडेसाती सुरु होईल. तर कर्क आणि वृश्चिक राशीवर शनि अडीचकी सुरु होईल. 


(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)