Shani Uday 2024 Effect on Zodiac Signs : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आपल्या विशिष्ट वेळी आपली स्थिती बदलत असतात. या नऊ ग्रहांमधील कर्मदाता आणि न्यायदेवता शनि सध्या स्वगृही कुंभ राशीत आहे. या महिन्यातील 11 फेब्रुवारीला तो अस्त स्थितीत आहे. पण लवकरच उदय स्थितीत येणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या ग्रह सूर्याच्या जवळ येतो तेव्हा तो ग्रह मावळतो आणि जेव्हा सूर्य दूर जातो तेव्हा तो ग्रह उगवतो.  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मावळणारा ग्रह हा अशुभ मानला जातो. यावेळी न्यायाची देवता शनि दहन अवस्थेत असून तो 18 मार्चपर्यंत शनि अस्त स्थितीत असणार आहे. 18 मार्च 2024 ला शनीचा उदय होणार असून अनेकांना आराम मिळणार असून त्यांना महालाभ होणार आहे. (Shani Uday 2024  Shani will wake up soon These zodiac signs will get money only money)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


राशींवर शनीच्या उदयाचा शुभ प्रभाव


वृषभ रास (Taurus Zodiac) 


या राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय खूप शुभ सिद्ध होणार आहे. या लोकांचे करिअर मजबूत होणार आहे. नोकरी आणि व्यवसायात मोठी प्रगती होणार आहे. ज्या पदोन्नतीची आणि उत्पन्नात वाढीची प्रतीक्षा होती आता ती पूर्ण होणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. तुमच्या मेहनतीचे अपेक्षेपेक्षा जास्त फळ मिळणार आहे. व्यावसायिकांसाठीही वेळ लाभदायक असणार असून त्यांना आर्थिक लाभ होणार आहे. 


तूळ रास (Libra Zodiac)  


शनीच्या उदयामुळे या राशीच्या लोकांसाठी अच्छे दिन सुरु होणार आहे. प्रगतीचा मार्ग खुला होणार आहे. तुम्ही पुढे वाटचाल करणार आहे. तुमची स्वप्ने पूर्ण होणार आहे. बढती-वाढ मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. एखाद्या व्यावसायिकासाठी मोठा करार निश्चित करणार आहेत. ज्यामुळे मोठा नफा तुम्हाला मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 


धनु रास (Sagittarius Zodiac) 


धनु राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय सकारात्मक परिणाम घेऊन येणार आहे. या लोकांना नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. नोकरीत बदली आणि नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला मिळणार आहे. सुख-समृद्धी वाढणार आहे. पैशाची आवक वाढणार आहे. तुमचं बँक बॅलन्स वाढणार आहे. तुम्हाला एखादी चांगली बातमी कळणार आहे. ज्यामुळे तुम्हाला आनंद होणार आहे.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)