Shani Dev Uday in marathi : ग्रहांचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्याचा काही राशींवर वाईट तर काही राशींवर चांगला परिणाम दिसून येतो. शनिदेव हा लोकांना त्याचा कर्मानुसार फळ देतो, असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं. गेल्या 30 वर्षांनंतर शनी हा कुंभ राशीत संक्रमण झालं आहे. जानेवारीच्या शेवटी शनिदेवाचं अस्त झालं. यामुळे काही राशींच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. मानसिक, शारीरिक आणि आर्थिक नुकसान सहन करावं लागलं होतं. आता शनिदेवाचा उदय 5 मार्च 2023 ला रात्री 8.38 वाजता होईल. त्याच्या वाढीमुळे काही राशीच्या लोकांचं नशीब साथ देईल आणि भरपूर पैसा मिळणार आहे. (Shani Uday Taurus Libra Leo Capricorn these people Bumper Lottery from 5th March and luck will brighten lot of money daily horoscope in marathi )


मकर (Capricorn)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांसाठी शनीच्या उदय हा शुभ काळ घेऊन आला आहे. या काळात तुम्ही जे काही काम कराल त्यात यश मिळेल.  स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना यश मिळणार. परदेशवारीची शक्यता आहे. 


सिंह (Leo)


या राशीच्या लोकांना बंपर लॉटरी लागणार आहे.  करिअर आणि बिझनेसमध्ये आर्थिक लाभ होणार आहे. या काळात नवीन काम सुरु करु शकता. वैवाहित जीवनात आनंद राहील. 


तूळ  (Libra)


या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप भाग्यशाली असणार आहे.  नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. व्यवसाय आणि राजकारणाशी संबंधित लोकांना यश मिळू शकतं. अविवाहित लोकांसाठी
विवाहाचे प्रस्ताव येणार. 


वृषभ  (Taurus)


या लोकांसाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे. त्यांना या काळात प्रत्येक गोष्टीत लाभ होणार आहे. आयुष्यात भरपूर आनंद असेल. नोकरदार लोकांना नवीन संधी मिळू शकतात. उत्पन्नात वाढ होईल. एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी भाग्यवान सिद्ध होणार आहे. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)