मुंबई: ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाच्या गोचराला खूप महत्त्व आहे. नऊ ग्रहांमध्ये प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदल करत असतो. चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदल करतो, तर शनि अडीच वर्षानंतर राशी बदल करतो. राहु आणि केतु हे ग्रह दर दीड वर्षानंतर राशी बदल करतात. पण त्यांचं मार्गक्रमण मीन राशीकडून मेष राशीकडे असतं. तर इतर ग्रह मेषपासून मीनकडे मार्गक्रमण करतात. त्यात मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि आणि राहु-केतु हे ग्रह वक्री होतात. तर चंद्र आणि सूर्य हे ग्रह वक्री होत नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनि ग्रहाने अडीच वर्षानंतर म्हणजेच 27 एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश केला होता. मात्र 5 जूनपासून शनि कुंभ राशीत वक्री होणार आहे. शनि ३० वर्षानंतर स्वामी राशी कुंभमध्ये 141 दिवस वक्री असतील. तसेच 12 जुलै रोजी मकर राशीत प्रवेश करतील. हा बदल काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ ठरणार आहे. 


मेष, वृषभ, मिथुन आणि धनु राशीला हा कालावधी शुभ असणार आहे. या राशीच्या लोकांची अडकलेली कामं मार्गी लागतील. त्याचबरोबर उत्पन्नातही वाढ होईल. आता मकर, कुंभ, मीन राशीला साडेसाती सुरु आहे. तर कर्क आणि वृश्चिक राशीला अडीचकी सुरु आहे. त्यामुळे शनि वक्री झाल्यास या राशीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


शनि कृपेसाठी उपाय


  • पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी राईच्या तेलाचा दिवा लावा

  • शनिवारी शनि मंदिरात जाऊन शनि देवांवर तेल अर्पण करा. पण असं करताना मूर्तीसमोर उभं राहू नका.

  • शनि चालीसाचं पठण करा.

  • काळं तीळ, उडद, काळे कपडे दान करा.

  • एका वाडग्यात तेल घ्या आणि त्यात आपला चेहरा पाहा. त्यानंतर ते तेल वाडग्यासह शनि मंदिरात ठेवा. छाया दान केल्याने लाभ मिळतो.

  • गरीबांची मदत करा. त्याना दान करा आणि त्यांच्याशी सन्मानाने बोला.


(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. अधिक माहिती आहे बातम्यांसाठी फॉलो करा 24 Tass.com )