Shani Vakri 2023 : ज्योतिष शास्त्राप्रमाणे अडीच वर्षात शनि त्याची राशी बदलतो. सध्या शनी कुंभ राशीत विराजमान आहे. तर दुसरीकडे 17 जून 2023 पासून शनी वक्री अवस्थेत जाणार आहे. यामध्ये  4 नोव्हेंबरपर्यंत शनी कुंभ राशीत वक्री अवस्थेम म्हणजेच उलट दिशेने फिरणार आहेत. 17 जून रोजी रात्री 10 वाजून 48 मिनिटांनी शनी वक्री अवस्थेत जाणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनीच्या या वक्री चालीमुळे काही राशींच्या आयुष्यावर शुभ आणि अशुभ प्रभाव पडणार आहे. यामुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींना अशुभ परिणाम पडण्याची शक्यता आहे, ते पाहुयात. 


या राशीच्या व्यक्तींना राहावं सांभाळून


मेष रास


या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात शनी वक्रीचा वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या व्यक्ती कितीही मेहनत करतील तरीही त्यांना फळ मिळणार नाही. वैवाहिक आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. आरोग्याच्या बाबतीत देखील सतर्क राहिलं पाहिजे. नोकरीच्या शोधतील सर्व प्रयत्न फेल होणार आहेत.


वृषभ रास


शनी वक्रीमुळे वृषभ राशीच्या लोकांना त्रासाचा सामना करावा लागणार आहे. या काळामध्ये संकट संपण्याचं नाव घेणार नाहीत. कामाचा ताण वाढत राहण्याची शक्यता आहे. यावेळी ठरवलेलं काम पूर्ण होण्यामध्ये विलंब होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्रास होणार आहे. 


कर्क रास


शनीच्या वक्री गतीमुळे कर्क राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. परिस्थिती कशीही असो अतिप्रमाणात ताण घेऊ नका. तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष घ्या. आर्थिक स्थिती या काळामध्ये खालावण्याची शक्यता आहे. कोणत्याही गोष्टीमुळे अचानक अस्वस्थता वाढू शकणार आहे.


तूळ रास


शनी वक्रीमुळे तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला नसणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे.जोडीदाराच्या बाबतीत या काळात थोडं संयमाने वागणं फायदेशीर ठरणार आहे. न्यायलयीन प्रकरणांमध्ये तुमच्या बाजूने निकान लागणार नाही. 


कुंभ


शनिदेवांची ही स्वरास असून ते याच राशीमध्ये विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला नसणार आहे. या काळामध्ये वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात. तरूणांनी खासकरून करिअरच्या बाबतीत काळजी घ्यावी. या काळात मानसिक त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)