Shardiya Navratri 7th Day 2023 : देशभरात नवरात्रोत्सव जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. शारदीय नवरात्रीला (Sharadiya Navratri 2022) हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. नवरात्रोत्सवात दररोज दुर्गा देवीच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. या काळात देवीला प्रसन्न करण्यासाठी भक्त 9 दिवस उपवास (Navratri significance) करतात. आज (2 ऑक्टोबर) नवरात्रीची सातवी माळ आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा (worship of Goddess Kalratri) केली जाते. या दिवशी देवी कालरात्रीची विधीवत पूजा केल्यास (Kalratri devi puja)आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे. देवी कालरात्रीची पूजा कशी करावी, काय कथा आहे आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या मंत्राचा जप करावा हे आज आपण जाणून घेणार आहोत. (shardiya navratri 2023 7th day Kalratri devi puja vidhi aarti mantra and bhog and mahaupay and navratri 7th day colors gray Saturday)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शनिवारचा रंग आणि सातवी माळ 


शुक्रवारचा रंग हा करडा आहे. सहावी माळ ही झेंडू किंवा नारिंगीची फुलांची अर्पण करतात. 


देवी कालरात्रीच्या पूजेची पद्धत


नवरात्रीच्या सातव्या दिवशी स्नान वगैरे आटोपून देवी कालरात्रीचे स्मरण करावे. यानंतर देवीच्या मूर्तीला किंवा प्रतिमेची पूजा करावी आणि देवीला अक्षता, उदबत्ती, सुगंधीत फुले आणि गुळ इत्यादींचा नैवेद्य श्रद्धेने अर्पण करावा. देवी कालरात्रीला रातराणी फूल अतिशय प्रिय आहे. त्यामुले देवीची पूजा करताना ही फुलं आवश्य अर्पण करावीत. यानंतर देवी कालरात्रीच्या मंत्रांचा जप करावा. शेवटी देवी कालरात्रीची आरती करा आणि दिवसभर देवीच्या खाली दिलेल्या मंत्राचा जप करावा.


देवी कालरात्रीचा मंत्र
‘ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै ऊं कालरात्रि दैव्ये नम:.’


या मंत्राचाही करा जप
एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता.
लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी॥
वामपादोल्लसल्लोहलताकण्टकभूषणा.
वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयंकरी॥


काय आहे देवी कालरात्रीची कथा?
पौराणिक मान्यतांनुसार देवी कालरात्री हे दुर्गा देवीच्या 9 रूपांपैकी एक आहे. देवी कालरात्रीचा रंग कृष्ण वर्णीय आहे आणि या रंगामुळेच देवीच्या या रुपाचे नाव कालरात्री असे आहे. चार भुजा असलेल्या देवी कालरात्रीने तिच्या दोन्ही डाव्या हातात अनुक्रमे कट्यार आणि लोखंडी काटा धरला आहे. असुरांचा राजा रक्तबीज याचा संहार करण्यासाठी दुर्गा देवीने तिच्या तेजाने देवी कालरात्रीची निर्मिती केली होती असे मानले जाते.


देवी कालरात्रीची आरती


कालरात्रि जय-जय-महाकाली।
काल के मुह से बचाने वाली॥


दुष्ट संघारक नाम तुम्हारा।
महाचंडी तेरा अवतार॥


पृथ्वी और आकाश पे सारा।
महाकाली है तेरा पसारा॥


खडग खप्पर रखने वाली।
दुष्टों का लहू चखने वाली॥


कलकत्ता स्थान तुम्हारा।
सब जगह देखूं तेरा नजारा॥


सभी देवता सब नर-नारी।
गावें स्तुति सभी तुम्हारी॥


रक्तदंता और अन्नपूर्णा।
कृपा करे तो कोई भी दुःख ना॥


ना कोई चिंता रहे बीमारी।
ना कोई गम ना संकट भारी॥


उस पर कभी कष्ट ना आवें।
महाकाली माँ जिसे बचाबे॥


तू भी भक्त प्रेम से कह।
कालरात्रि माँ तेरी जय॥


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)