Shash Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठरावीक वेळेनंतर आपलं स्थान बदलतात. ग्रहांच्या या राशीबद्दलामुळे कुंडलीत अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. गजकेसरी, गजलक्ष्मी, बुधादित्य, कलात्मक, लक्ष्मी नारायण आणि गजकेसरी असे राजयोग निर्माण होतात. ग्रहांच्या युतीमुळे किंवा त्यांच्या स्थानामुळे हे राजयोग ज्यांच्या कुंडलीत तयार होतात त्यांना ग्रहानुसार लाभ होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनीदेव हा कर्मचा दाता आणि न्यायाची देवता म्हणून वैदिक ज्योतिषशास्त्रात ओळखला जातो. त्यामुळे शनिदेवाची जाचकाला भीती वाटते. असं म्हणतात कुंडलीत शनीची अशुभ स्थिती ही व्यक्तीला सिंहासनावरून जमिनीवर घेऊन येतो. तर जेव्हा शनीची हीच स्थिती मजबूत असते तेव्हा द्रारिद्र्यातून तो राजासारख आयुष्य जगतो. शनिदेवामुळे तयार होणार राजाचं आयुष्य देणारा राजयोग म्हणजे शश राजयोग. या राजयोगामुळे व्यक्तीला सर्व सुख-सुविधा, मान-सन्मान आणि संपत्ती प्राप्त होते. (shash rajyog in kundali get money shani dev astrology in marathi)


कुंडलीत कसा तयार होता शश राजयोग? 


षष्ठ योग तयार होतो तेव्हा शनि आरोही घरातून किंवा चंद्र घरातून केंद्रस्थानी असतो. याचा अर्थ जेव्हा कुंडलीत शनिदेव तूळ, मकर किंवा कुंभ राशीत चंद्रापासून 1व्या, 4व्या, 7व्या आणि 10व्या स्थानात असतो. तेव्हा शश राजयोग निर्माण होतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात अशा लोकांची कुंडली खूप वेगळी आणि भाग्यवान समजली जाते. 


शश योगाच्या जाचका मिळतो हा लाभ 


हा राजयोग ज्या व्यक्तीच्या कुंडलीत तयार होतो तो व्यक्ती मोठा राजकारणी होऊ शकतो, असं म्हणतात. जर एखाद्याच्या कुंडलीत शनिदेव उच्च स्थानावर विराजमान असेल तर त्या व्यक्तीला आपल्या करिअरमध्ये खूप प्रसिद्धी मिळते. अशा लोकांमध्ये संकटातून बाहेर पडण्याची मजबूत क्षमता शनीदेवाने दिली असते. या राजयोगातील लोकांसाठी संपत्तीची कमतरता कधीही भासत नाहीत. 


यासोबतच हा राजयोग जाचकांना शनीच्या अशुभ प्रभावापासून दूर ठेवण्यास मदत करतो.  या लोकांच्या जीवनात चैनीने भरलेले असतं. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि समाजात नाव, प्रतिष्ठा लाभते. 


हेसुद्धा वाचा -  Kalatmak Yog : 'या' राशींच्या नशिबात 13 ऑगस्टपासून पैसाच पैसा! चंद्र आणि शुक्र युतीमुळे कलात्मक योग


 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)