Shash Rajyog: ज्यावेळी शनिदेव त्यांची चाल तसंच दिशा बदलतात त्यावेळी त्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर होतो. वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये शनीला विशेष स्थान आहे. सर्व ग्रहांमध्ये शनिदेव हा सर्वात संथ गतीचा ग्रह आहे. शनिदेव सध्या स्वतःच्या राशीत कुंभ राशीत असून 2025 पर्यंत ते या राशीत राहणार आहेत. शनी कुंभ राशीत असल्यामुळे शष महापुरूष राजयोग तयार झाला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात हा योग अत्यंत शुभ मानला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुंभ राशीत बसलेल्या शनिने निर्माण केलेला शष महापुरुष 4 राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होणार आहे. काही महिने नाही तर तब्बल अडीच वर्षांसाठी लाभ मिळू शकणार आहे. जाणून घेऊया या 4 राशी कोणत्या आहेत. 


मेष रास


मेष राशीच्या लोकांवर शष महापुरुष योगाचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. हा काळ विद्यार्थ्यांसाठी उत्तम असणार आहे. हा योग तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरू शकतो. मुख्य म्हणजे, यावेळी तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला प्रत्येक कामात चांगलं यश मिळू शकतं. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची चिन्ह आहेत. कुटुंबामध्ये असलेल्या सर्व समस्या दूर होऊ शकणार आहेत. 


वृषभ रास


शष महापुरुष योग वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. यावेळी तुम्हाचा अचानक अज्ञात स्त्रोताकडून पैसे मिळू शकणार आहेत. तुमचा आत्मविश्वास वाढून तुम्ही चांगली कामगिरी करू शकणार आहे. समाजामध्ये तुम्हाला मान-सन्मान मिळणार आहे. तुम्ही जे काम हाती घ्याल त्या कामामध्ये यश मिळू शकणार आहे. नशिबाच्या चांगल्या पाठिंब्याने तुम्हाला यश मिळू शकणार आहे.


कन्या रास


कन्या राशीच्या लोकांना शष महापुरुष योग कठीण प्रसंग मदत करणार आहे. तुम्हाला गमावलेल्या संपत्तीतून भरपूर पैसै मिळणार आहेत. आर्थिक लाभाच्या उत्तम संधी मिळू शकणार आहेत. पगारात वाढ होऊन तुमचं प्रमोशन देखील होऊ शकतं. तुमच्या चांगल्या कामामुळे वरिष्ठ तुमच्यावर खूश होणार आहेत. नशीब तुमच्या सोबत असल्याने तुमची सर्व काम पूर्ण होऊ शकतात. 


कुंभ रास


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांवर अडीच वर्षांपर्यंत शनिदेवाची कृपा राहणार आहे. यावेळी चांगल्या आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नोकरीच्या ठिकाणी काही त्रास असेल तर तो दूर होऊ शकणार आहे. बिघडलेली नाती पुन्हा पहिल्याप्रमाणे होऊ शकणार आहेत. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)