Shattila Ekadashi 2024 Rashifal in Marathi: हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षटतिला एकादशी साजरी करण्यात येते. यंदा षटतिला एकादशी 6 फेब्रुवारीला असून या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत. एकादशी तिथी ही भगवान विष्णुला समर्पित असते. यादिवशी विष्णूदेवाला प्रसन्न करण्यासाठी तिळाचे उपाय केल्यास मोक्ष प्राप्ती मिळते असं म्हणतात. यादिवशी व्याघत योग, हर्ष योग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांसह अनेक शुभ संयोग जुळून येत आहे. त्यात मंगळ देवाने मकर राशीत गोचर काही राशींसाठी षटतिला एकादशी भाग्यशाली सिद्ध होणार आहे. (Combination of many auspicious yogas on Shattila Ekadashi these zodiac signs will get lot of money)


'या' राशींसाठी एकादशी भाग्यशाली!


मिथुन रास (Gemini Zodiac)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

षटतिला एकादशीला जुळून आलेले शुभ योग हे या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या लोकांच्या धनसंपत्तीत घसघशीत वाढ होणार असल्याची शक्यता वैदिक ज्योतिषशास्त्रात वर्तविण्यात आली आहे. या दिवशी नवीन कामं सुरू करण्यासाठी शुभ आहे. तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होणार आहेत. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या अनेक संधी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळणार असून सर्व संकटांपासून मुक्ती मिळणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Shattila Ekadashi 2024 : मोक्ष प्राप्तीसाठी 'या' शुभ मुहूर्तावर साजरी करा षटतिला एकादशी! तिथी, पूजा विधी जाणून घ्या


सिंह रास (Leo Zodiac) 


देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ षटतिला एकादशीला होणार आहे. व्यवसायाची स्थिती या दिवशीपासून सुधारणार आहे. भौतिक सुखसोयी आणि संपत्तीत वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण असणार आहे. व्यावसायिक जीवनात प्रगतीच्या भरपूर संधी मिळणार आहेत.


तूळ रास (Libra Zodiac)  


या राशीच्या लोकांसाठी षटतिला एकादशीचा दिवस खूप शुभ सिद्ध होणार आहे. भगवान विष्णूच्या कृपेने वैवाहिक जीवनातील समस्या दूर होणार आहे. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येणार आहे. खडलेली कामं सुरू होणार आहेत. नोकरदारांना बढतीची संधी मिळणार आहेत. व्यवसायात लाभ होणार आहे. हा एक शुभ काळ तुमच्यासाठी सिद्ध होणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)