Sheetala Saptami 2023 : शितला सप्तमी ही भारतात अनेक ठिकाणी आषाढ कृष्ण सप्तमीला 14 मार्चला साजरी करण्यात आली आहे. पण महाराष्ट्रासह अनेक भागात ती आज म्हणजे श्रावण शुक्ल सप्तमीला साजरी करण्यात येते. शितळा सप्तमी किंवा शिळा सप्तमी या नावाने ओळखली जाणाऱ्या या सणाबद्दल अनेक कथा आहेत. देवी शीतला ही आरोग्याची देवता असूनही तिला शितळा सप्तमीला शिळं अन्नांचं नैवेद्य दाखवलं जातं. शिवाय आजच्या दिवशी गृहिणींना स्वयंपाकापासून सक्तीची विश्रांती असते. स्कंद पुराणात (Skanda Puran), माता शीतला चेचक, गोवर आणि कॉलरा यांसारख्या संसर्गजन्य रोगांपासून रक्षण करणारी देवी आहे असा उल्लेख करण्यात आला आहे. (sheetala saptami 2023 importance and katha Shravan Special Astrology Today in marathi )


गृहिणींना स्वयंपाकापासून सक्तीची विश्रांती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शितळा सप्तमीला घरातील चूल, शेगडी गॅस स्टोव्ह इत्यादी स्वयंपाकासाठी लागणाऱ्या साधनांची पूजा अर्चा केली जाते. त्यामुळे शितळा सप्तमीला महिलांना स्वयंपाकापासून सुट्टी मिळते. या दिवशी शितळा देवीची पूजा करण्यात येते. मग पूजेनंतर देवीला आधल्या दिवशी केलेले अन्न म्हणजे शिळं अने नैवेद्य म्हणून लावण्यात येतं. असं म्हणतात की शितला देवीची पूजा केल्याने मुलांना आजार होतं नाहीत त्यांच्यावरील सर्व संकट दूर होतात, अशी मान्यता आहे. 


शितला सप्तमीची कथा !


शितळा सप्तमीच्या अनेक कथा आहेत. त्यातील एका कथेनुसार शितला देवी सप्तमीला भाजली होती. तेव्हापासून तिला थंड पदार्थ थंड गोष्टी दिल्या जातात. शितला देवीचा वास हा स्वयंपाकघरातील गॅसजवळ असतो असं म्हणतात. म्हणून सप्तमीला चूल पेटवली जात नाही. 


दुसऱ्या एका कथेनुसार आटपाट नगरीच्या राजाचा तळ्याला पाणी येतं नाही म्हणून चिंतेत असतो. तो जलदेवतेला प्रार्थना करते त्यावेळी देवता राजाला नातवाचा बळी दे तुझ्या तळाला पाणी लागेल असं सांगते. त्यानंतर राजा परतो आणि सूनेला माहेरी पाठवतो. मात्र नातव्याला आपल्याजवळ ठेवतो. सून माहेरी गेल्यावर राजा चांगला दिवस पाहून नातव्याला तळ्यात ठेवून देतो. राजाचं हे बलिदान पाहून दलदेवता प्रसन्न होते आणि तळ्याला पाणी येतं. 


सून श्रावण शुद्ध सप्तमीला घरी परते तेव्हा तिला वशाची आठवण होते. ती तळावर जाऊन पूजा करते आणि काकडीच्या पानावर दहीभात, लोणी, एक सुपारीचं वाण ती भावाला देते. दुसरं वाण ती तळ्यात जलदेवतेला समर्पित करते. त्यावेळी सून प्रार्थना करते आमच्या वंशज पाण्यात बुडाले असतील तर त्यांना आम्हाला परत करत. त्यावेळी सूनेला तिचा मुलगा परत मिळतो. राजा हे पाहून आश्चर्यचकित होता. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)