मुंबई : शंकर भगवान हे देवांचे दैवत म्हणून ओळखले जातात. यांना भोळा शंकर, महादेव, शिव अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. असे मानले जाते की भगवान शिव कोणावरही नाराज नसतात. तसेच त्यांना खुश करणे खूपच सोपं आहे. त्यामुळे तर हिंदू पुराणातील कथेनुसार, ते राक्षसांवर देखील प्रसन्न व्हायचे आणि त्यांनी अनेक राक्षसांना वरदान देखील दिलं आहे. त्यांपैकी एक आहे रावण, रावण राक्षस असला तरी तो शिव भक्त होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भगवान शिव आपल्यावर प्रसन्न व्हावेत, म्हणून मनुष्य देखील अनेक प्रयत्न करतात. तसेच ते सोमवारी भगवान शिवची विधिवत पूजा देखील करतात. भगवान शंकराच्या पूजेमध्येही शिवलिंगाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे.


असे मानले जाते की, शिवलिंगावर काही वस्तू अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात.  परंतु अशा ही काही वस्तु आहेत, ज्या भोले शंकरांना आवडत नाहीत, त्यामुळे अशा गोष्टी शंकराला कधीही अर्पण करू नयेत. कारण असे केल्याने भगवान शिव क्रोधित होऊ शकतात आणि भक्तांना या गोष्टीचे नुकसान सहन करावे लागू शकते. चला जाणून घेऊया भगवान शंकराला काय अर्पण करू नये.


शिवलिंगावर या वस्तू अर्पण करायला विसरू नका


हळद
हिंदू धर्मातील प्रत्येक पूजा किंवा विधीमध्ये हळदीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. पण शिवलिंगावर हळद अर्पण करु नका. धार्मिक ग्रंथानुसार शिवलिंग हे पुरुष तत्वाचे प्रतीक आहे आणि हळदीचा वापर सौंदर्य उत्पादन म्हणून केला जातो. असे मानले जाते की शिवलिंगाला हळद अर्पण केल्यास व्यक्तीचा चंद्र कमजोर होतो.


कुमकुम किंवा सिंदूर
हिंदू धर्मात कुमकुम आणि सिंदूर यांना विशेष महत्त्व आहे. स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुमकुम किंवा सिंदूर लावतात. तसेच काही लोक शिवलिंगाला सिंदूरही अर्पण करतात, परंतु शिव पुराणात असे म्हटले आहे की शिवलिंगाला चूकूनही कुंकु लावू नका.


तुळशी
हिंदू धर्मातील अनेक देवतांच्या पूजेदरम्यान तुळशीची पाने अर्पण केली जातात. मात्र शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण कधीही करु नका. पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने तुळसीच्या पतीचा वध केला होता. तेव्हापासून त्यांना तुळशीची पाने अर्पण केली जात नाहीत.


लाल आणि केतकीची फुले
पूजेच्या वेळीही भोलेशंकरांना लाल रंगाची फुले अर्पण करू नयेत. एके काळी भोलेशंकरांनी केतकीच्या फुलांना शाप दिला की, ते कधीही भगवान शंकराला पूजेत लाल फुले अर्पण करणार नाहीत.


नारळ पाणी
नारळ हे लक्ष्मीचे रूप मानले जाते, त्यामुळे अभिषेक करताना शिवाला नारळपाणी अर्पण करू नये. यासोबतच शिवलिंगावर अर्पण केलेल्या वस्तू देखील आपण स्वत:सोबत आणू नका.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)