Dussehra 2024 Horoscope : विजयादशमी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक मानला जातो. यंदा दसरा काही राशींसाठी सोन्याचे दिवस आणणार आहे. कारण दसऱ्याला शुक्र तूळ राशीमध्ये स्थित असल्यामुळे मालव्य राजयोग तयार होत आहे. तर शनिदेवही या दिवशी स्वतःच्या कुंभ राशीत असणार आहे. त्यामुळे शश राजयोग निर्माण होणार आहे. त्यासोबत श्रावण नक्षत्रही असेल. याचा परिणाम 12 राशींवरही पडणार आहे. पण 3 राशींसाठी हा योग अतिशय शुभ भाग्यशाली मानला जातोय. (shubh sanyog after 100 years on Dussehra these zodiac signs money and gold )


वृषभ (Taurus Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळणार आहे. सुख-सुविधांमध्ये वाढ होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. लव्ह लाईफमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा फायदा मिळणार आहे. नोकरदारांसाठी काळ अनुकूल असणार आहे. तुम्हाला बढतीची चांगली बातमी देखील कानावर पडणार असल्याने तुम्ही प्रसन्न असणार आहात. 


तूळ (Libra Zodiac)  


या राशीच्या लोकांसाठी संबंध येऊ शकतात ज्यांचे लग्न झालेले नाही. तसंच, ज्या लोकांना त्यांचं लग्न निश्चित करण्यात अडचणी येत आहेत त्यांचे निराकरण केलं जाणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे. बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करणार आहेत. कौटुंबिक संबंध दृढ होईल. ज्या कामात तुम्ही मेहनत कराल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे.


मकर (Capricorn Zodiac)   


या राशीच्या लोकांच्या करिअरसाठी काळ चांगला असणार आहे. नवीन संधी उपलब्ध होणार आहे. तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल तर तो तुम्हाला परत मिळणार आहे. जुन्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवणार आहात. आरोग्यही पूर्वीपेक्षा चांगले राहणार आहे. कोणताही आजार तुम्हाला खूप दिवसांपासून त्रास देत असेल तर तो दूर होईल. अविवाहितांसाठी विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. याशिवाय जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना कुठूनतरी चांगली ऑफर मिळू शकते. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)