Venus Transit 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सुख आणि समृद्धीचा कारक शुक्र ग्रह जेव्हा जेव्हा संक्रमण करतो तेव्हा सर्व राशींवर त्याचा परिणाम होतो. 18 जानेवारीला रात्री 8.46 वाजता शुक्राने धनु राशीत प्रवेश केला असून तिथे तो 12 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. शुक्र हा सौंदर्य, आनंद, वाहन, संपत्ती, कला आणि व्यावसायिक संबंधाचा कारक आहे. शुक्राच्या शुभ प्रभावामुळे माणसाला सर्व प्रकारच्या सुखात वाढ होते. त्याचबरोबर शुक्राच्या अशुभ प्रभावामुळे जाचकाच्या आयुष्यात संकट येतं. शुक्र गोचरमुळे कुठल्या राशीच्या लोकांना सावध राहायचं आहे जाणून घ्या. (Shukra Gochar 2024 Due to the transit of Venus in Sagittarius there is a crisis in the life of the people of this zodiac sign)


वृषभ रास (Taurus Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनु राशीतील शुक्राचं संक्रमण हे या राशीच्या लोकांसाठी घातक असणार आहे. हे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक चढ-उतार आणणार आहे. तुमच्या आयुष्यात अचानक अशी काही घटना घडू शकते ज्यासाठी तुम्ही तयार नसणार आहात. यामुळे तुम्हाला भावनिक पातळीवर अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. तुम्ही भावुक होणार आहात. तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात मतभेद होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक नुकसानही सहन करावं लागणार आहे. 


कर्क रास (Cancer Zodiac)   


धनु राशीतील शुक्राचं संक्रमण या राशीच्या लोकांसाठी नुकसानदायक ठरणार आहे. यामुळे तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावं लागणार आहे. शुक्र परिवर्तनामुळे तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे. इच्छित परिणाम मिळविण्यासाठी आपल्याला बराच वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. तुम्हाला तुमच्या कामातही अनेक समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक अडचणींचा येणार आहेत. सध्या तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार टाळा. शिवाय तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या. 


मकर रास (Capricorn Zodiac)  


मकर राशीचे लोक शुक्राच्या संक्रमणामुळे मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ असणार आहेत. तुमचं उत्पन्न वाढेल पण त्यासोबतच तुमचं खर्चही दुप्पटीने वाढणार आहे. या राशीच्या लोकांनी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे फार गरजेच आहे. यावेळी, तुम्ही पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा अन्यथा तुमचं मोठं नुकसान होणार आहे. आर्थिक स्तरावर कोणताही निर्णय काळजीपूर्वक विचार करुनच घेणे तुमच्यासाठी हिताचं होईल . या राशीच्या लोकांनी या काळात अनावश्यक खर्च करणं टाळावा लागणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)