Shukra Rashi Parivartan 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, आज  शुक्र ग्रह स्वतःच्या राशीत तूळ राशीत प्रवेश करत आहे. शुक्राचा हा बदल त्रिकोणी राजयोग बनवत आहे. ज्याचा सर्व 12 राशींवर चांगला आणि वाईट प्रभाव पडेल. शुक्र हा धन, ऐशोआराम, भौतिक सुख, प्रेम, सौंदर्य, आकर्षण यांचा ग्रह असल्यामुळे लोकांच्या जीवनातील या क्षेत्रांवर त्याचा परिणाम होईल. शुक्राचे संक्रमण 3 राशींच्या लोकांसाठी खूप शुभ ठरु शकते. जाणून घ्या कोणत्या या 3 भाग्यशाली राशी आहेत. 


शुक्र गोचरमुळे होईल धनलाभ  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कन्या : शुक्राच्या संक्रमणामुळे तयार होणारा त्रिकोणी राजयोग कन्या राशीच्या लोकांना खूप लाभदायक ठरेल. नोकरदारांच्या पगारात वाढ होऊ शकते. व्यापाऱ्यांना व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. तुम्ही घर-कार किंवा मौजसंबंधित कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी करु शकता. जीवनसाथीबरोबर संबंध चांगले राहतील. लव्ह लाईफ चांगले राहिल आणि सहलीला जाऊ शकता. 


मकर : शुक्राच्या राशीतील बदलामुळे तूळ राशीच्या लोकांना खूप शुभ परिणाम मिळतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रगतीची दाट शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरु करु शकता. पदोन्नती मिळू शकते. धनलाभ होईल. उत्पन्न वाढल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. विवाह होऊ शकतो. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळाल्याने यश मिळेल. 


कुंभ : शुक्राचे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांचे नशीब उजळेल. प्रत्येक कामात यश मिळेल. तुम्ही प्रवासाला जाल आणि तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरी-व्यवसायात लाभ होईल आणि मान-सन्मानही वाढेल. परदेशात काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल. 


(Disclaimer:येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)