मुंबई : रविवार 7 ऑगस्ट रोजी शुक्र मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राचं हे राशी परिवर्तन पहाटे 5.30 च्या सुमारास होईल. यानंतर 31 ऑगस्टपर्यंत शुक्र या राशीत राहील. ज्योतिषींचा दावा आहे की, शुक्राचे हे संक्रमण रक्षाबंधनापूर्वी चार राशींसाठी खूप भाग्यवान सिद्ध होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीन- मीन राशीत मुलांची प्रगती होत आहे. पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी मिळतील. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल राहील. परीक्षेत चांगले. परिणाम मिळतील. शुक्र संक्रमणानंतर अन्नदान करा. तुमचा शुभ रंग जांभळा आहे.


सिंह- सिंह राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल. नोकरी-व्यवसायासाठी काळ अतिशय शुभ असणार आहे. व्यावसायिक जीवनात तुम्ही केलेल्या कामाचे खूप कौतुक होईल. आर्थिक आघाडीवर पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी मिळतील. नोकरी-व्यवसायात चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचा शुभ रंग हिरवा आहे.


वृषभ- तुमचे वैवाहिक जीवन सुधारेल. नोकरीत प्रतिष्ठा वाढेल. मानसिक समस्या दूर होतील. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आर्थिक संकटातून तुम्ही मुक्त व्हाल. अनेक दिवसांपासून कर्जात बुडालेले रुपयेही वसूल होऊ शकतात. या दरम्यान सूर्यदेवाला जल अर्पण करावे. गुलाबी रंग तुमचा भाग्यशाली रंग असेल.


कन्या - कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असेल. व्यवसायात नफा वाढेल. जमीन किंवा वाहन खरेदीसाठी काळ अतिशय शुभ आहे. नातेसंबंधांना प्राधान्य द्याल. भावंडांशी संबंध सुधारतील. या मार्गक्रमणानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा. तुमचा शुभ रंग निळा आहे.