Shukraditya Rajyog: सूर्य-शुक्राच्या युतीने बनणार शुक्रादित्य राजयोग; `या` राशींना व्यापारात मिळणार उत्तम संधी
Shukraditya Rajyog 2024 : याशिवाय यंदाच्या महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य देखील 14 मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या काळात वृषभ राशीमध्ये शुक्र आणि सूर्य यांच्या संयोगामुळे 10 वर्षांनंतर शुक्रादित्य राजयोग तयार होणार आहे.
Shukraditya Rajyog 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी दर महिन्याला ग्रह कुठला ना कुठला ग्रह त्याची चाल बदलतो. ग्रहांच्या गोचरमुळे अनेक राजयोग तयार होतात. यावेळी एप्रिलप्रमाणे आता मे महिन्यातही ग्रहांचे मोठे संक्रमण होणार आहे. या काळात शुक्र 19 मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.
याशिवाय यंदाच्या महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य देखील 14 मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या काळात वृषभ राशीमध्ये शुक्र आणि सूर्य यांच्या संयोगामुळे 10 वर्षांनंतर शुक्रादित्य राजयोग तयार होणार आहे. यावेळी तो काही राशींसाठी शुभ ठरणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात लाभ होणार आहे.
वृषभ रास
शुक्रादित्य राजयोगाचा योग अविवाहितांसाठी भाग्यवान ठरू शकतो. या काळात तुम्हाला अनेक अद्भुत संधी मिळतील. संवाद माध्यमातील लोकांना या कालावधीत आवडीच्या महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.
कर्क रास
सूर्य, शुक्र आणि शुक्रादित्य राजयोग या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. यावेळी आर्थिक स्थिती मजबूत राहील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. नशीब तुमच्या बाजूने असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.
मिथुन रास
शुक्र आणि सूर्य यांचा योग आणि शुक्रादित्य राजयोग लोकांसाठी चांगला राहील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती कराल आणि यश मिळवाल. कामानिमित्त परदेशात जाण्याचीही संधी मिळेल.
मेष रास
सूर्य आणि शुक्र आणि शुक्रादित्य राजयोग यांचा संयोग लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. नोकरदारांना वेतनवाढ आणि बढतीचा लाभ मिळू शकतो. नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. करिअरमध्ये अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )