Money Astrology Tips : हिंदू धर्मात शास्त्रानुसार प्रत्येक दिवस हा कोणच्या कोणत्या देवाला समर्पित केला आहे. शुक्रवार हा माता संतोषी आणि वैभव लक्ष्मीला समर्पित करण्यात आला आहे.  शुक्रवारी माँ लक्ष्मीची पूजा केल्याने मां लक्ष्मी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. शुक्रवारी लक्ष्मीची पूजा केल्याने तिचा आशीर्वाद कायम राहतो. यासोबतच सर्व संकटे दूर होतात, आर्थिक विवंचना दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सौंदर्य, ऐश्वर्य, वैभव, कला, संगीत आणि वासना यांचा कारक मानला जातो. शुक्राचे लोक धन आणि वैभवाने संपन्न असतात. शुक्राच्या अशुभ प्रभावामुळे काही राशीचे जीवन हे दारिद्यीकडे जाते. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही पण हे उपाय करा आणि माता लक्ष्मीचं आशिर्वाद प्राप्त करा. 


शुक्र ग्रहाला असं करा मजबूत 


शु्क्र ग्रह मजबूत झाल्यानंतर व्यक्तीची आर्थिक स्थितीही मजबूत होते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात शुक्राच्या शांतीसाठी उपाय सांगितले आहेत. (Shukrawar Money Upay Money Astrology Tips astrological remedy for friday marathi news)


शुक्र ग्रहासाठी हे उपाय करा! 


1. शुक्र यंत्राची पूजा करा
2. शुक्राच्या बीज मंत्राचा जप करा
3. शुक्राशी संबंधित वस्तूंचं दान करा
4. शुक्रवारी उपवास करा
5. देवी लक्ष्मीची पूजा करा
6. हिरे रत्ने धारण करा


शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी 



1. माँ लक्ष्मी किंवा माँ जगदंबेची पूजा करा.
2. श्री सूक्ताचं पठण करावं.
3. शुक्राच्या शांतीसाठी शुक्रवारी व्रत ठेवा.
4. शुक्रवारी दही, खीर, ज्वारी, अत्तर, रंगीबेरंगी कपडे, चांदी, तांदूळ इत्यादींचे दान करा.



शुक्रवारी हा उपाय करा 



पांढरा आणि गुलाबी रंगाचे कपडे परिधान करा. 
सकाळी गाई मातेला ताजी रोटी खाऊ घाला. 
आर्थिक संकट दूर करण्यासाठी महालक्ष्मीचे ध्यान करा. 
दर शुक्रवारी माँ लक्ष्मीच्या मूर्तीसमोर 11 दिवस अखंड ज्योत लावा. 11 व्या दिवशी आईच्या नावाने 11 मुलींना खाऊ घालावा. यामुळे पैशाची कमतरता भासणार नाही. 


दर शुक्रवारी दक्षिणावर्ती शंखात पाणी भरून भगवान विष्णूंना अभिषेक केल्याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते.
माँ लक्ष्मीला लाल ठिपका, सिंदूर, लाल चुनरी आणि लाल बांगड्या अर्पण केल्याने धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. 


या मंत्रांचा जप करा 


विष्णुप्रिये नमस्तुभ्यं, नमस्तुभ्यं जगद्वते
आर्त हंत्रि नमस्तुभ्यं, समृद्धं कुरु मे सदा
नमो नमस्ते महांमाय, श्री पीठे सुर पूजिते
शंख चक्र गदा हस्ते, महां लक्ष्मी नमोस्तुते
ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)