Shani Margi 2023 : शनिदेवाला सर्वार्थ सिद्धी योगाची साथ! दसरा दिवाळीला `या` राशी होणार श्रीमंत
Shani Margi 2023 : दसरा दिवाळीला शनिदेव काही राशींच्या लोकांना मालामाल करणार आहे. शनिदेवाला सर्वार्थ सिद्धी योगाची साथ मिळणार आहे. त्यामुळे नवमीपासून काही राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे.
Shani Margi 2023 / Sarvartha Siddhi Yoga : न्यायदेवता आणि कर्माचा दाता शनिदेव जेव्हा कधी आपली स्थिती बदलतो याचा परिणाम 12 राशींच्या लोकांवर दिसून येतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव हा जाचकाला त्याचा कर्माची फळं देतो. चांगले कर्म असेल तर चांगले आणि वाईट कर्म असेल तर शिक्षा देतो. शनिदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सर्वात संथ गतीने म्हणजे जवळपास अडीच वर्ष लावतो.
या वर्षी शनिदेव स्वगृही कुंभ राशी विराजमान झाला आहे. आता शनिदेव लवकरच मार्गी होणार आहे. नवरात्रीच्या नवमी तिथीला शनिदेव मार्गी होऊन 4 नोव्हेंबरला ही प्रक्रिया पूर्ण करणार आहे. या प्रक्रियेत शनिदेवाला सर्वार्थ सिद्धी योगाची साथ मिळणार आहे. नवमी तिथी म्हणजे 23 ऑक्टोबर आणि 4 नोव्हेंबर सर्वार्थ सिद्धी योग आहे. तुमच्या राशीचा भाग्यशाली राशीत समावेश आहे का जाणून घ्या. (Siddhi Yoga support for Shani Dev Shani Margi 2023 these 3 zodiac sign will be rich on Dussehra Diwali)
मिथुन (Gemini Zodiac)
या राशीला शनिदेव आणि सर्वार्थ सिद्धीचा जबदस्त फायदा होणार आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचं कौतुक होणार असून तुमच्या मान सन्मान वाढणार आहे. आध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढणार आहे. घरातून तुमच्या कानावर गोड बातमी मिळणार आहे.
तूळ (Libra Zodiac)
या राशीच्या लोकांच्या आयुष्यात शनिदेव आनंद घेऊन येणार आहे. कुटुंबात सुख समृद्धी वाढणार आहे. महिलांसाठी आनंदायी वातावरण असणार आहे. कामाचं नियोज व्यवस्थित केल्यास तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. शनिदेव तुमच्यासाठी धनाची पेटी घेऊन येणार आहे.
हेसुद्धा वाचा - Navratri 2023 : 100 वर्षांनंतर नवरात्रीत शश योगासोबत 2 राजयोग! 'या' राशींना आर्थिक लाभासह नशिबाची साथ
मकर (Capricorn Zodiac)
या राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा बरसणार आहे. दसरा दिवाळी मालामाल करणार आहे. बिझनेस करणाऱ्या लोकांना नफा होणार आहे. गुंतवणुकीतून जबरदस्त फायदा होणार आहे. राजकारणात प्रवेश करण्यासाठी योग वेळ आहे. मुलांकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. संवादातून मन जिंकणार आहात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)