Vastu Tips : उंबरठाखाली चांदीची तार का लावावी?
Vastu Tips for Home : घराचा मुख्य दरवाजा वास्तूशास्त्रात अतिशय महत्त्वाचा असतो. मुख्य प्रवेश द्वारावर उंबरठाखाली चांदीची तार किंवा पंचरत्न लावण्याची प्रथा आहे. यामागील कारण तुम्हाला माहितीय का?
Vastu Tips Main Door : आयुष्यात सुख, समृद्धीसह आर्थिक प्रगतीसाठी तुमच्या घरातील मुख्य दरवाजा हा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो, असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलंय. अनेकांच्या घराच्या मुख्य दरवाज्याला तुम्ही पाहिलं असेल लाकडी उंबरठा असतो. या उंबरठ्याला वास्तूशास्त्रात खूप महत्त्व आहे. उंबरठा वास्तू दोष नष्ट करतो, असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलंय. उंबरठा हा बाहेरील वाईट शक्ती म्हणजे नकारात्मक ऊर्जा रोखण्यासाठी महत करतो. बिल्डिंग संकल्पनेमुळे अनेक घरांना उंबरठा नसतो. त्यामुळे अशा घरांमध्ये वास्तूदोष दिसतो. नवीन घर बांधताना घराच्या उंबरठ्याखाली चांदीची तार लावण्याचा उपाय वास्तूशास्त्रात सांगण्यात आलंय. (Silver strip or string for prosperity and wealth in umbra Patti at the main entrance Vastu Tips in marathi )
उंबरठाखाली चांदीची तार का टाकावी?
घराच्या मुख्य दरवाज्याबाहेर कचरा, अस्वच्छता नसावी. रद्दी, अडगळीचे सामन, चप्पलांचा पसारा नसावा. तर उंबरठावर शुभ चिन्ह म्हणजे लक्ष्मीची पाऊलं, स्वस्तिक, शुभ - लाभ हे असावे. वास्तूशास्त्रानुसार उंबरठा हा चंद्र आणि पृथ्वीचं प्रतीक आहे. उंबरठाचा बाहेरचा भाग हा सौरऊर्जेचा प्रतीक आहे, तर उंबरठा आतील भाग चंद्र ऊर्जेचा भाग आहे. तर उंबरठ्याचा मधला भाग पृथ्वी ऊर्जाचा मानला जातो.
वास्तूशास्त्रानुसार उंबरठ्याच पूजन दररोज करावं, अन्यथा दर पौर्णिमेला केलं तरी हरकत नाही. पण मग पौर्णिमेला उंबरठ्याची पूजा करताना पंचोपचार पूजा करावी. ही पूजा करण्यापूर्वी आधी संडा टाकून रांगोळी काढावी. त्यानंतर दिवा लावा. उंबरठ्यावर हळद कुंकू आणि फुलं अर्पण करावी. अगरबत्ती लावावी. या उंबरठ्यावर नैवेद्य म्हणून साखर अर्पण करावी.
ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आणि आनंदी वास्तू आनंद पिंपळकर यांनी उंबरठ्या खाली चांदीची तार का असावी याबद्दल सांगितलंय. ते म्हणतात की, चांदीचा पायाने लक्ष्मी घरात येते. त्यामुळे उंबरठ्याखाली चांदीची तार लावावी. मुख्य दरवाजाखाली चांदीची प्लेट, चांदीची तार, चांदीचा सिक्का किंवा चांदीचा तुकडा असायलाच पाहिजे. रोज आपण घराबाहेर पडो आणि अनेक ठिकाणी जातो, वॉशरुम असो किंवा अगदी कोणाचा अंत्यविधीसाठी स्मशानभूमी असो. दिवसभरात आपण असंख्य ठिकाणी फिरत असतो.
अशात आपण आपल्या भोवती ऊर्जेचं जाळ घेऊन घरी येतो. या ऊर्जेमध्ये अनेक वेळा नकारात्मक ऊर्जाही असते. अशावेळी जेव्हा आपण उंबरठा ओलांडून घरात येतो तेव्हा ती ऊर्जा घरात येते. अशात ही नकारात्मक ऊर्जा आपल्या वास्तूत येते. जर तुमच्या उंबरठ्याखाली चांदीची तार असेल तर ही नकारत्मक ऊर्जा उंबरठ्या बाहेर राहते, ती घरात प्रवेश करु शकत नाही. उंबरठ्याच लाकूड हे शिशव, सागवान, चंदन, खैर आणि औदुंबर असल्यास तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जाचा वावर वाढतो.
उंबरठ्याला हळदीचे लेपन का आणि कसे करावे?
त्यासोबत उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडावे किंवा हळदीचे लेपन करावे. यामुळे घरातील वास्तु आणि ग्रह दोष दूर होतात. तुम्ही दर गुरुवारी हळदीचे लेपन करु शकता. हळदीमध्ये गुलाब जल घालून ते उंबरठ्याला लावावे. दर गुरुवारी शक्य नसल्यास अमावस्या, पौर्णिमा, शुक्रवार, मंगळवारी तुम्ही हळदीचे लेपन करु शकता. उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्यानंतर त्यावर रांगोळीने शुभ चिन्ह काढावे. दाराबाहेर शुभ कलश स्थापन करावं. उंबरठ्याजवळ दिवे लावावेत.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)