Hybrid Surya Grahan :  या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण गुरुवारी 20 एप्रिल 2023 असणार आहे. खगोलशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाला (Solar Eclipse 2023) विशेष महत्त्व आहे. यंदाचं सूर्यग्रहण (April 20 Solar Eclipse) खूप खास आहे. कारण यावेळी 100 वर्षांनी 'हायब्रीड सूर्यग्रहण' (Hybrid Surya Grahan) दिसणार आहे.  (Suryagrahan 2023 date and time in india)


आंशिक, पूर्ण, कंकणाकृती ग्रहण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा आंशिक, पूर्ण, कंकणाकृती आणि संकरित अशा चार स्वरुपांत दिसणार आहे.  नेमकं जेव्हा चंद्र सूर्याच्या एका छोट्या भागासमोर येतो. तेव्हा काही आंशिक सूर्यग्रहण होतं. त्यानंतर चंद्र सूर्याच्या मध्यभाग येतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण होतं. पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एका सरळ रेषेत असताना पूर्ण सूर्यग्रहण होतं. अशावेळी पृथ्वीवर अंधार पडतो. हे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नयेत. 


हायब्रीड सूर्यग्रहण म्हणजे काय? (Hybrid Surya Grahan)


संकरित सूर्यग्रहण हे आंशिक, एकूण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण यांचं मिश्रण असतं. हे सूर्यग्रहण 100 वर्षात एकदाच दिसतं. या सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्राचे पृथ्वीपासूनचं अंतर जास्त किंवा कमी नसते. या दुर्मिळ ग्रहणादरम्यान, सूर्य काही सेकंदांसाठी रिंगसारखा आकार बनवतो, ज्याला रिंग ऑफ फायर म्हणतात.


सूर्यग्रहणाची वेळ (Suryagrahan 2023 date and time in india)


वर्षातील पहिलं सूर्यग्रहण गुरुवारी 20 एप्रिल (solar eclipse april) म्हणजे उद्या आहे. हे ग्रहण सकाळी 7.45 ते दुपारी 12.29 पर्यंत असणार आहे. 


भारतात दिसणार का ग्रहण? (when is solar eclipse in india)


हे ग्रहण भारतीयांना पाहता येणार नाही. त्यामुळे भारतात सूर्यग्रहण काळात सूतक नसणार आहे. तर हे ग्रहण कंबोडिया, चीन, अमेरिका, मायक्रोनेशिया, मलेशिया, फिजी, जपान, सामोआ, सोलोमन, बेरुनी, सिंगापूर, थायलंड, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, व्हिएतनाम, तैवान, पापुआ न्यू गिनी, इंडोनेशिया, फिलीपिन्समध्ये दिसणार आहे. 


 


हेसुद्धा वाचा -  Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला 500 वर्षांनी पंचग्रह योग! 'या' राशींना बक्कळ धनलाभ होणार


 


वैज्ञानिक आणि पौराणिक मान्यता


वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण हे कायम मेष आणि अश्विनी नक्षत्रात होतं. मात्र यंदा 19 वर्षांनी सूर्यग्रहण हे मेष राशीत होणार आहे. सूर्यग्रहण धार्मिक दृष्टिकोनातून अशुभ मानलं जातं. तर विज्ञानदृष्टीने ग्रहण ही नवीन काही तरी सकारात्मक घडामोडीचं प्रतिक आहे. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण बाबत ज्योतिषशास्त्रात आणि वैज्ञानिकदृष्टीकोनातून वेगवेगळी मान्यता आहे.  


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)