`या` लोकांसाठी 2025 चं पहिलं सूर्यग्रहण ठरणार अत्यंत अशुभ! प्रचंड आर्थिक नुकसानीसह समस्या वाढणार
Solar Eclipse 2025 Negative Effect : ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण हे अशुभ मानलं जातं. अवघ्या काही दिवसांमध्ये नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. अशात नवीन वर्ष 2025 मधील पहिलं सूर्यग्रहण 3 राशींसाठी नकारात्मक ठरणार आहे.
Solar Eclipse 2025 Negative Effect : नवीन वर्षाची सगळे जण आतुरतेने वाट पाहत आहेत. अवघ्या काही दिवसांनंतर डिसेंबर महिना संपून नवीन वर्ष 2025 ची सुरुवात होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्ष 2025 मध्ये चार ग्रहण असणार आहेत. यात 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण असेल. यातील पहिलं सूर्यग्रहण हे चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण हे अशुभ मानलं जातं. ग्रहण काळात शुभ कार्य करण्यास बंदी असते. गर्भवती महिलांनी तर ग्रहण काळात अनेक नियम सांगण्यात आलंय. नवीन वर्ष 2025 मध्ये पहिलं सूर्यग्रहण 29 मार्च रोजी दुपारी 02:20 वाजेपासून संध्याकाळी 06:16 वाजेपर्यंत असणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने सुतक काळ नसणार आहे. पण हे सूर्यग्रहण तीन राशींच्या लोकांसाठी अशुभ असणार आहे. (solar eclipse of 2025 Negative Effect for these zodiac signs problem will increase with huge financial losses surya grahan 2025 )
मेष रास
या राशीच्या लोकांच्या जीवनावर सूर्यग्रहणाचा नकारात्मक परिणाम होणार आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होणार आहे. अनावश्यक खर्च वाढणार आहे. कार्यालयात विरोधकांपासून सावध राहा, ते तुमच्याविरोधात कट रचण्याचा विचार आहात. या काळात कुठेही गुंतवणूक करणे टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.
कर्क रास
या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये अडचणी येणार आहे. कामाच्या ठिकाणी अधिकारी त्रास देणार आहेत. दैनंदिन कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. मुलांशी मतभेद होऊ शकतात. पैसा आणि गुंतवणुकीच्या बाबतीत कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. आर्थिक बचत बिघडू शकते. अध्यात्माकडे कल वाढणार आहे. या काळात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.
मीन रास
या राशीच्या लोकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागणार आहे. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवणार आहे. खर्च अचानक वाढणार आहे. कोणताही नवीन प्रकल्प किंवा गुंतवणूक करु नका. विचारपूर्वक मोठे निर्णय घ्या अन्यथा अडचणीत सापडाल. प्रत्येक गोष्ट इतरांसोबत शेअर करू नका. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुमचे पूर्ण झालेले काम पैशामुळे बिघडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)