Astro Tips : सोमवारी चुकूनही करु नका `ही` कामं; नकळत घडलेली एक कृती ठरेल घातक
Somvar Upay : आठवड्याची सुरुवात झालेली असतानाच हा दिवस आणि येणारा प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यात सुखाची उधळण करणारा असावा असंच प्रत्येकाला वाटतं. मग त्यासाठी काही कृतींना अटकाव घालणं गरजेचंच आहे.
Somvar Upay : आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण सुखाची बरसात करणारा असो, अशीच कामना आपल्यापैकी अनेकजण करताना दिसतात. मग याला जोड मिळते काही समजुतींची आणि अर्थातच विश्वासाची. अमुक गोष्टी करा, हे मिळेल. तमुक करा हे टळेल अशा या विश्वासाच्या दुनियेत आठवड्याच्या पहिल्या वाराचं म्हणजेच सोमवारचंही अनन्यसाधारण महत्त्वं आहे. धार्मिक मान्यतांचा आधार घ्यायचं झाल्यास या दिवशी (Lord Shankar) ची पूजा केली जाते. असं म्हणतात की कुणीही सोमवारी शंकराची आराधना केल्यास त्यांच्यावर देवादीदेव महादेवाचा आशीर्वाद राहतो. सर्व क्लेश दूर होतात, इच्छा आकांक्षा पूर्ण होतात.
सोमवारच्या दिवशी उपवास, व्रतवैकल्य केल्यामुळं जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. कुमारिकांसाठी हे उपवास अतिशय फायद्याचे असतात. पण, हे सर्व करत असताना काही गोष्टींची काळजी घेतली जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये अत्यंत लहानसहान पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. (Somvar Vrat)
सोमवारी नेमकं काय करु नये?
- आजच्या दिवशी शंकरापुढे नारळ फोडत असाल, थोडक्यात शंकराला नारळ अर्पण करणार असाल तर त्याचं पाणी शंकराच्या मूर्तीवर उडणार नाही याची काळजी घ्या.
- सोमवारच्या दिवशी चुकूनही जुगार खेळू नका. परस्त्रीवर वक्रदृष्टी टाकू नका.
- शंकराच्या पुजेसाठी तुळशीपत्राचा वापर करु नका.
- सोमवारच्या दिवशी काळ्या रंगाची वस्त्र परिधानकरू नका.
- सोमवारचा दिवस असा आहे जेव्हा तुम्ही कोणतंही चुकीचं काम करु नका. अर्थाच हा नियम वर्षाचे सर्व दिवस पाळला तर अधिक उत्तम.
हेसुद्धा वाचा : Horoscope 30 January 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींसाठी पैसे कमवण्यासाठी आजचा दिवस चांगला!
असं म्हणतात की, सोमवारच्या दिवशी महामृत्यूंजय मंत्राचा 108 वेळा जप केल्यानं त्याचा फायदा होतो. ज्यांच्या लग्नामध्ये अडथळे येत आहेत किंवा ज्यांचं होत नाही त्यांना सोमवारच्या उपवासांचा फायदा होतो. आज शंकराच्या पुजेनं तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होणार आहेत.
कशी करावी शंकराची पूजा?
नारद पुराणामध्ये दिलेल्या माहितीनुसार सोमवारी प्रत्येक व्यक्तीनं सकाळी स्नान करून शंकराला बेलपत्र आणि पाण्याचा अभिषेक घालावा. शंकरासोबतच गौरीचीही पूजा करावी. पुजेनंतर सोमवारची व्रतकथा वाचावी. सात्विक आहार घ्यावा. सायंकाळपर्यंत हा उपवास ठेवावा.