Sawan Somvati Amavasya 2023 : ज्या महिन्यात अमावस्या ही शनिवारी येते तिला शनि अमावस्या असं म्हणतात. तर जी अमावस्या सोमवारी येते तिला सोमवती अमावस्या असं म्हणतात. यंदा अमावस्या अतिशय खास आहे. या दिवशी अतिशय शुभ आणि दुर्मिळ योगायोग जुळून आले आहेत. अमावस्येला पितरांची पूजा करण्यासाठी खूप शुभ मानलं जातं. त्याशिवाय अमावस्येला माता पार्वती आणि भोलेनाथाची पूजा केल्यामुळे पुण्य प्राप्त होतं असं म्हणतात. (Somvati amavasya 2023 date 3 auspicious snan daan muhurat puja time and importance Sawan Somvati Amavasya 2023)



सोमवती अमावस्या 2023 तिथी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचांगानुसार बघायचं झालं तर अमावस्याची तिथी कृष्ण पक्षातील रविवारी 16 जुलैला रात्री 10:08 पासून आरंभ होणार आहे. तर 17 जुलैला रात्री 12:01 वाजेपर्यंत असणार आहे. अशात नेमकी अमावस्या कधी आहे, असा प्रश्न पडला आहे. तर उदयतिथीनुसार सोमवती अमावस्या ही 17 जुलैला सोमवारी पाळायची आहे. 


सोमवती अमावस्येला 3 शुभ संयोग


या दिवशी तीन असे दुर्मिळ आणि शुभ संयोग जुळून आले आहेत. पुष्कर योगसोबतच रुद्राभिषेक आणि सर्वार्थ सिद्धी योगाचे 3 शुभ योगायोग आहेत. पंचांगानुसार 17 जुलैला सकाळी 05.11 ते 05.35 या वेळेत सर्वार्थ सिद्धी योग असणार आहे. तर रुद्राभिषेकासाठी संपूर्ण दिवस शुभ असून हा योग सकाळपासून रात्री उशिरापर्यंत 12:01 पर्यंत असणार आहे. 



सोमवती अमावस्येला पूजेचा विधी 


पहाटे उठून आंघोळ केल्यानंतर काळे तीळ पाण्यात टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. 
पूजा घर स्वच्छ करुन माता पार्वती आणि भोलेनाथाची पूजा करा. 
शिवलिंगावर प्रथम अभिषेक करा.
त्यानंतर बेलपत्र, भांग, धतुरा, फुलं इत्यादी अर्पण करा.
पूजा झाल्यानंतर शिव चालीसा आणि शिव मंत्रांचा उच्चार करताना रुद्राक्षाची माळ जपा.
पूजा संपन्न झाल्यानंतर ब्राह्मणांना दान दक्षिणा द्या. 


 


हेसुद्धा वाचा - 200 वर्षांनंतर अशुभ चतुर्गुण पापकर्तरी योग! 4 राशींच्या आयुष्य होणार नरक


सोमवती अमावस्येला 'हे' काम नक्की करा!


सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही पिपळाच्या झाडाची पूजा करायला विसरू नका. या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान वगैरे झाल्यावर गंगाजल मिश्रित पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. त्यानंतर कच्च्या सुती धाग्याने पिंपळाच्या झाडाची 108 वेळा प्रदक्षिणा मारा. असं म्हणतात हा उपाय केल्यास महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं. 


सोमवती अमावस्या 2023 स्नान-दान शुभ मुहूर्त


सोमवती अमावस्या दिवशी स्नान, दान आणि पूजा करण्यासाठी दोन शुभ मुहूर्त असून पहिला शुभ मुहूर्त पहाटे 05.34 ते 07.17 दरम्यान आहे. तर दुसरा मुहूर्त सकाळी 09:01 ते 10:44 पर्यंत असणार आहे. सोमवती अमावस्येचा अभिजित मुहूर्त दुपारी 12:00 ते 12:55 पर्यंत असणार आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )