मुंबई : सहसा प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, असं सांगण्यात येतं. ही स्त्री, तिचं भाग्य आणि त्यासोबत येणारी सकारात्मक उर्जा त्या व्यक्तीच्या यशाचं कारण ठरते. समुद्र शास्त्र (Samudra Shastra) या विद्येमध्ये यावर विशेष निरीक्षणाची नोंद आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समुद्र शास्त्रामध्ये व्यक्तीच्या शरीररचनेवर आधारित स्वभावगुण, अवगुणांवर भाष्य करण्यात आलं आहे. हातापायांची रचना, त्यावर असणाऱ्या रेषा बरंच काही सांगतात जे समुद्र शास्त्रात नमुद आहे. 


समुद्र शास्त्रानुसार ज्या महिला गौरवर्णी आहेत, ज्यांचं मस्तक, चेहरा चमकदार आहे त्या भाग्यशाली असतात. अशा महिला कुटुंबाचं नाव मोठं करतात. 


अशा महिलांना त्यांच्या सासरकडूनही फार मान मिळतो, असं इथं सांगण्यात आलं आहे. 


ज्या महिलांच्या डोळ्यांच्या वरचा भाग हलक्या लाल रंगाचा असतो, डोळे काळेभोर असतात, किंवा डोळ्यांचा पांढरा भाग गायीच्या दुधासारखा असतो, त्यासुद्धा नशीबवान असतात. 


अतिशय लाघवी चाल असणाऱ्या, सडपातळ बांध्याच्या महिलासुद्धा नशीबवान असतात. 


हातावरील रेषा हलक्या गुलाबी रंगाच्या, खोलवर गेलेल्या आणि स्पष्ट असतात अशा महिला सौभाग्यवती असतात. त्यांना सर्वप्रकारचं सुख अनुभवता येतं. 


हाताची लांब बोटं असणाऱ्या महिलांच्या भाग्याचा फायदा हा त्यांच्या पतीला होतो. 


प्रत्येक महिलेच्या चेहरेपट्टी आणि शरीररचनेमध्ये असणाऱ्या बदलाप्रमाणेच काही गोष्टी प्रकर्षाने बदलतात. परिणामी प्रत्येक महिला ही तिच्या परीने नशीबवानच असते. 


(वरील माहिती सर्वसामान्य समजुती आणि संदर्भांच्या आधारे उपलब्ध झाली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)