मेष- अत्यंत महत्त्वाचे काम उरकण्यासाठी योग्य दिवस. कामाची प्रशंसा होईल. काही समस्यांचे निराकरण होईल. पैसा, खरेदी आणि अन्य व्यवहारात चांगला लाभ मिळेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- आजचा दिवस एकूणच चांगला. नोकरी व धंद्यात मनाप्रमाणे गोष्टी घडतील. मित्रांच्या गाठीभेटी होतील. 


मिथुन- मानसिक स्थिती चांगली राहील. सर्व गोष्टी ध्यानात ठेवून व्यवहार केल्यास धनलाभ होण्याची शक्यता. अविवाहितांना लग्नासाठी प्रस्ताव येतील. अनेक गोष्टींमध्ये नशीबाची साथ मिळेल. 


कर्क- दिवस धावपळीचा असेल. नोकरी-व्यवसाय, आरोग्य आणि इतर गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज. तुर्तास संयम राखून प्राप्त परिस्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. 


सिंह- एखादा अवघड आणि गुंतागुंतीच्या व्यवहारात यश मिळेल. नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर नवी संधी मिळण्याची शक्यता. रोजच्या दिनचर्येत बदल झाल्याने आराम मिळेल. 


कन्या- काही नवीन किंवा वेगळ्या गोष्टी कराव्याशा वाटतील. जोडीदाराची साथ लाभेल. व्यावहारिक दृष्टीकोन बाळगाल तर यश नक्कीच पदरात पडेल. नोकरी किंवा व्यवसायातील अडथळे दूर होती. 


तूळ- एकाग्रता आणि मेहनतीने काम करता येईल. त्यामध्ये यशही मिळेल. इतरांशी वाद होण्याचा संभव, परंतु चर्चेने प्रश्न सुटतील.


वृश्चिक- एखादे काम वेळेवर पूर्ण केलेत तर त्याचे श्रेय तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे अनेकजण प्रभावित होतील. प्रेमीयुगुलांसाठी चांगला दिवस.


धनु- कामावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज. इतरांची मदत करावी लागेल. काही गोष्टींमध्ये गुप्तता बाळगल्यास यश पदरात पडेल. 


मकर- जोडीदाराने केलेली मागणी पूर्ण करावी लागेल. अचानक फिरायला जाण्याचा योग संभवतो. अनेक समस्या सुटतील. 


कुंभ- तुमचे मन प्रसन्न राहील. एखाद्या कामात गुप्तता बाळगल्यास यश मिळण्याची अधिक शक्यता. जोडीदारीह चांगल्या मूडमध्ये असेल. 


मीन- तुम्ही ठरवलेली अनेक कामे पार पडतील. काही नव्या लोकांच्या भेटीचा योग. नोकरी किंवा व्यवसायासंबंधी महत्वाचा सल्ला मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवाल तर भविष्यात फायदा मिळेल.