मेष : काही कामांमध्ये बाधा येऊ शकते. मेहनत जास्त करावी लागेल. नोकरी बदलण्याचे मन करेल पण विचारपूर्वकच निर्णय घ्या. कोणत्याही कामामध्ये घाई करु नका. आज तुम्ही नवी गाडी किंवा मोबाईल घेण्याचा विचार कराल. पैसे आणि सेव्हींगच्या बाबतीत दूरच्या व्यक्तीचा सल्ला घ्या. गुंतवणूक किंवा खर्चाच्या बाबतीत चर्चा होऊ शकते. जोडीदार चांगल्या मुड मध्ये राहील. वैवाहीक जीवनात आनंद मिळेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ : व्यवसायात फायदा होऊ शकतो. नोकरदार वर्गाला बढती मिळू शकते. सहकार्यांची मदत मिळेल. जोडीदाराची मदत होण्याचे योग आहेत. कामाच्या पद्धतीत बदल होऊ शकतो. कामावरील ताण कमी होऊ शकतो.  करियरमध्ये पुढे जायच्या काही चांगल्या संधी मिळतील.


मिथुन : ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी खास आहे. आज तुम्ही सक्रीय असाल. ऑफिसमध्ये नवे काम आणि जबाबदारीही तुम्हाला मिळू शकेल. यामध्ये तुम्हाला नशीबाची साथ मिळेल. अडलेली कामे पूर्ण होतील. काही नवी माणसे तुमच्याशी जोडली जातील. प्रेमामध्ये धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला भावनात्मक सपोर्ट मिळेल. सामाजिक आणि सामूहिक कामांसाठी तुम्हाच्या भेटीगाठी वाढतील. आरोग्यात सुधार होईल.


कर्क : ऑफिसमध्ये तुम्ही काही लोकांना इम्प्रेस करु शकता. नोकरी बदलण्याचा किंवा जास्त पगार मिळवण्याचा विचार कराल. यामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. अचानक फायदा होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नव्या डील होतील. आत्मविश्वास वाढेल. पारिवारीक सुख आणि संतोष मिळेल. दुर्घटना किंवा जखम होण्याचे योग आहेत. तुम्हाला संभाळून राहावे लागेल. 


सिंह : वरिष्ठांकडून सहकार्य कमीच मिळेल आणि तुम्हाला थोड सावध राहावे लागेल. ऑफिस किंवा व्यवसायात जे काही काम हातामध्ये घ्याल त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. घाई करु नका. अर्धवट कामे पूर्ण करु नका. आज मिळणारा पैसा येणाऱ्या काळासाठी जपून ठेवा. जोडीदारासोबत प्रवास होऊ शकतो. कोणत्या तरी प्रोग्रामचे प्लानिंग बनवू शकता. 


कन्या : आज व्यवसाय आणि नोकरीमध्ये मोठे निर्णय होऊ शकतात किंवा प्लानिंग होऊ शकते. पैशांच्या बाबतीत सुधार होईल. मिळकत वाढवणे आणि खर्च कमी करण्याचा विचार कराल. आज तुम्ही नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घेऊ शकाल. नोकरीत बदल किंवा प्रमोशनची शक्यता आहे. कोणी न मागता सल्ला देऊ नका. तुमच्या आरोग्यात पहिल्यापेक्षा सुधार होऊ शकतो. 


तुळ : काही अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरी किंवा व्यवसायात वेळेत मदत न मिळाल्याने त्रास होऊ शकतो. काही लोक कामात तुम्हाला विरोध करु शकतात. काहीतरी नवीन आणि जास्त करण्याचा तुम्हा विचार कराल. जोडीदाराकडून मदत आणि सहकार्य मिळेल. आज तुम्हाला विवाहाचा प्रस्ताव मिळू शकतो. वैवाहीक आयुष्य आनंदात जाईल. 


वृश्चिक : व्यवसायात फायदा होण्याचा योग आहे. नोकरदार वर्गासाठी चांगला वेळ आहे. काही अडलेली कामे पूर्ण होतील. जुन्या अडचणी सुटू शकतील. विरोधकांवर विजय प्राप्त कराल. नवे काम करण्याची इच्छा होईल. काही मोठ्या जबाबदारी पूर्ण होतील. व्यापारी प्रकरणे समजून करा. काही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही कुठे तरी फिरायला जाल. जोडीदाराकडून तुम्हाला मदत मिळू शकते. 


धनु : नोकरदार वर्गाची अडकलेली कामे पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्यांनी सावधान राहा. कायदेशीर बाबीत अडकून राहाल. वायफळ कामात वेळ खर्च होण्याची शक्यता आहे. कामकाजासाठी बाहेर जाण्याचा योग आहे. तुमच्या वैवाहीक आयुष्यात बदल होण्याची शक्यता आहे. अविवाहीत लोकांसाठी वेळ चांगली आहे. आरोग्याच्या बाबतीत संभाळून राहा. 


मकर : जुन्या अडचणी संपू शकतात. मकर राशीसाठी स्थिती अनुकूल असेल. अडलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय आणि नोकरीमध्ये नव्या आयडीया मिळू शकतील. तुमचे एनर्जी लेवल वाढू शकते. कोणावरी डोळे बंद करुन विश्वास ठेवू नका. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आरोग्याच्या बाबतीत दिवस ठिक आहे. आजारातून सुटका मिळेल. 


कुंभ : कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला आहे. कार्यालयात सहकार्यांकडून मदत मिळू शकते. काही चांगल्या आणि मोठ्या बदलांची शक्यता आहे. अनुभवी लोकांकडून कार्यालय आणि व्यवसायात सहकार्य मिळू शकते. मालमत्तेच्या प्रकरणांसाठी दिवस चांगला आहे. महत्त्वाच्या लोकांना भेटण्याचा योग आहे.लव्ह लाईफसाठी दिवस चांगला असेल. आरोग्य लक्षात ठेवा.
 
मीन : अचानक फायदा मिळण्याचा योग आहे. जोडीदार तुम्हाला मदत करेल तर धन लाभ होईल. नवे इनकम सोर्स मिळतील. ऑफिसमध्ये नवे काम किंवा जबाबदारी मिळेल. काहीही बोलताना सावधानता बाळगा. आरोग्याच्या बाबतीत सावधान राहा. साथीच्या आजारांचा त्रास होऊ शकतो.