राशीभविष्य : आज `या` राशीच्या व्यक्तींची अडकलेली कामं पूर्ण होणार
ची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करा. तशी संधीही तुम्हाला मिळेल. जुनं आजारपण दूर होईल.
मेष- अडकलेली कामं पूर्ण होतील. कौटुंबीक संबंध चांगले असतील. स्वत:ची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करा. तशी संधीही तुम्हाला मिळेल. जुनं आजारपण दूर होईल.
वृषभ- दिवसभर व्यग्र असाल. कामाच्या ठिकाणी आदर वाढेल. वेळ चांगला आहे. तुमच्या जीवनात काही महत्त्वाचे बदल करावे लागतील. अविवाहितांना विवाहासाठी स्थळ येतील.
मिथुन- घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमचा खर्च वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. पोटाचे विकार जडतील.
कर्क- नोकरीमध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव घेऊ नका. जास्त विचार करु नका. अचानक काही अडचणी वाढतील. झोप कमीच असेल.
सिंह- कुटुंबात सुख- शांती असेल. कामाच्या ठिकाणी काही नवे आणि मोठे निर्मय घ्याल. साथीदाराकडे प्रेम व्यक्त कराल. आज तुमची अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत.
कन्या- कामाचा व्याप वाढेल. कनिष्टांची मदत मिळेल. मोठ्यांचंही सहकार्य मिळेल. दिवस थकवणारा असेल. आराम करा, काही अडचण येणार नाही.
तुळ- नोकरी आणि व्यवसायामध्ये लाभ मिळणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. नशीबाची साथ मिळेल. कोणाचंही मन न दुखवता चांगली कामं करा. कोणावरही भावना लादू नका.
वृश्चिक- व्यवसायात फायदा होईल. बदली होऊ शकते. नको त्या कामांमध्ये मन रमेल. अविवाहितांना तणावाला सामोरं जावं लागेल.
धनु- दैनंदिन कामं पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. विचारपूर्वक निर्णय घ्या. परिस्थिती चांगली आहे. आरोग्यात चढ उतार जाणवतील. खाण्यापिण्याची काळजी घ्या.
मकर- आज कोणतेही नवे व्यवहार करु नका. पैसे अडकतील. दिवसाची सुरुवात चांगली असेल. परिस्थिती तुमच्या नियंत्रणात आहे.
कुंभ- आर्थिक चणचण दूर होईल. सहकारऱ्यांची मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगलं आणि प्रभावी काम कराल. अचानक धनलाभ होईल. अडकलेली कामं पूर्ण होतील. प्रयत्नपूर्वक काही समस्या सोडवा.
मीन- व्यापार विस्ताराचा विचारही करु नका. महागड्या वस्तूंची खरेदी कराल. पैसे खर्च करण्यासाठी चतुराईने काम करा. थकवा जाणवेल. प्रेमसंबंधांमध्ये दिवस चांगला आहे.