आजचे राशीभविष्य | शुक्रवार | १४ जून २०१९
तुमचा आजचा दिवस कसा जाईल.
मेष- धनलाभ होण्याची शक्यता. हितशत्रूंना शह देण्यात यशस्वी व्हाल. ऑफिसमध्ये कामाचा भार वाढेल. मात्र, बढतीची शक्यता. आजुबाजूच्या लोकांकडून आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल.
वृषभ- तुमच्या कामाने आणि बोलण्याने इतरांवर प्रभाव पाडाल. एखाद्या समारंभाचे आमंत्रण मिळेल. प्रवासाचा योग संभवतो. येणाऱ्या काळात याचा फायदा होऊ शकतो.
मिथुन- आर्थिक आवक वाढेल. नव्या लोकांच्या भेटीगाठी होतील. आवडीची कामे करायला मिळतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कामाच्या पद्धतीत बदल करा.
कर्क- करिअरवर संपूर्ण लक्ष केंद्रित कराल. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल. मित्रांशी भेटीगाठी होतील. एखादी शुभवार्ता कानावर पडेल.
सिंह- सार्वजनिक जीवनात अत्यंत सक्रिय असाल. कठीण परिस्थितीत लोक तुमच्या पाठिशी उभे राहतील. अनेकजण गुप्तपणे मदत करतील. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणात यश मिळेल.
कन्या- आजचा दिवस सामान्य असेल. आर्थिक देवाणघेवाण किंवा गुंतवणुकीची योजना आखाल. तुमच्या आजुबाजूला गजबजाट असेल. मात्र, एकाग्रतेने काम करू शकाल. मेहनत जास्त करावी लागेल. मात्र, यशही पदरात पडेल.
तूळ- तुमची कामे विनासायास पार पडतील. काहीजण तुमच्याकडून फार अपेक्षा ठेवतील. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज. आर्थिक संधीकडे लक्ष ठेवा. लोकांची मदत मिळेल. कामे वेळेवर पूर्ण होतील.
वृश्चिक- बढती आणि आर्थिक उन्नती होण्याचा योग. नव्या ठिकाणी जायला मिळेल, नवीन गोष्टी शिकता येतील. प्रेमप्रकरण पुढे सरकेल. कामाच्या ठिकाणी स्वत:च्या कामगिरीकडे लक्ष द्या.
धनू- महत्त्वाच्या लोकांशी चांगला ताळमेळ ठेवाल. याचा फायदा होऊ शकतो. नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. काही नवे पेच उभे राहू शकतात.
मकर- नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीविषयी कुटुंबीयांशी चर्चा कराल. काही कामे लवकर उरकावी लागतील.
कुंभ- कोणतीही नवी जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी विचार करा. दुसऱ्यांची मदत कराल. ठरवलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक आवक होईल.
मीन- तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडण्याची शक्यता. तणाव कमी होईल. एखाद्या गोष्टीविषयी दुसऱ्यांचा सल्ला घ्याल. घरात जास्त काम करावे लागू शकते. प्रेमप्रकरणासाठी अनुकूल दिवस.