Shani Gochar in Kumbh 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिला सर्वात धीमा ग्रह म्हटले गेले आहे. असे सांगितले जाते की, शनी उशीरा फळ देतो. ((Shani Gochar) सामान्यतः शनी हा केवळ त्रास देणारा ग्रह मानला जातो, परंतु तसे नाही. शनी देखील शुभ फळ देतो आणि ज्यावर शनीची कृपा असते, त्याचे आयुष्य बदलण्यास वेळ लागत नाही. 17 जानेवारी 2023 रोजी शनी 3 दशकांनंतर कुंभ राशीत स्वतःच्या मूळ त्रिकोणी राशीत प्रवेश करणार आहे. ही एक अतिशय महत्त्वाची ज्योतिषीय घटना आहे. त्यामुळे याचा लाभ काही लोकांसाठी होणार आहे. कुंभ राशीत शनीच्या प्रवेशामुळे 'शश महापुरुष राजयोग' निर्माण होईल. यामुळे 3 राशीच्या लोकांना शनीच्या गोचरमुळे मोठा फायदा होईल. त्यांना चांगले दिवस येणार आहेत. जाणून घ्या कोणत्या राशींना जास्त फायदा होईल. (Shani Gochar in Marathi News)


शनी गोचरने या लोकांचे भाग्य उजळणार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी शनी खूप शुभ ठरणार आहे. कारण वृषभ राशीचा स्वामी शुक्र हा शनिचा चांगला मित्र आहे. म्हणूनच शनी गोचर तयार झाल्याने शश महापुरुष राजयोग तुम्हाला सर्व सुख देईल. तुम्हाला मोठे पद मिळू शकते. धनलाभ होऊ शकतो. परदेश दौऱ्यावर जाऊ शकता. अविवाहितांचे विवाह होतील. घरात चांगले कौटुंबिक वातावरण निर्माण होईल.


तुळ - या राशीचा स्वामी शुक्र देखील आहे, त्यामुळे या राशीच्या राशीच्या लोकांसाठी शनिच्या राशी बदलामुळे खूप शुभ परिणाम मिळतील. भविष्यात करिअरमध्ये चांगला लाभ मिळू शकतो. आतापर्यंतच्या करिअरमधील अडथळे दूर होतील. मोठी प्रगती होईल. सरकारी क्षेत्रातून लाभ होईल. व्यावसायिक नवीन काम सुरू करु शकतात. व्यवसाय वाढवण्यासाठीही हा काळ उत्तम आहे. मोठा फायदा होऊ शकतो.  


धनु - या राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण खूप चांगला योग बनवेल. या लोकांचे सर्व अडथळे आणि त्रास दूर होतील. समाजात मान-सन्मान मिळेल. राजकारणाशी संबंधित लोकांना मोठे यश मिळू शकते, जे त्यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरु शकते. धैर्य आणि इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही सर्वात कठीण काम देखील पूर्ण कराल.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)