मेष- अडणींवर मात करण्यासाठी तुम्हाला मैदानात उतरावं लागेल. पुन्हा नव्या अडचणींमध्ये गुंतण्याची शक्यता आहे. कोणाशीही वाद, तंटा होऊ शकतो. मानसिक तणाव वाढेल. खाण्यापिण्यावर लक्ष द्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- दुसरे काय म्हणत आहेत त्यावर लक्ष केंद्रीत करा. विचार चांगले ठेवा  विचाराधीन कामं पूर्ण होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.  साथीदाराची साथ मिळेल. 


मिथुन- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. आरोग्याची अधिक काळजी कराल. खाण्यापिण्याच्या बाबतीत सावध राहा. 


कर्क- दुसरे लोक काय म्हणत आहेत हे  पाहणं देखील तितकचं महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळी तुम्ही बरोबर असाल असं होवू शकत नाही. 


सिंह- स्वत:चं  मत मांडा. आज अन्य लोकांना सांगण्याची गरज आहे की तुम्ही कोय विचार करता. नाही तर तुम्ही कायम लोकांच्या दबावा खाली राहाल. 


कन्या- कुटुंबाची मदत मिळेल. मानसिक परिस्थिती संतुलित असेल ज्याचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर नियंत्रण ठेवा. आरोग्य उत्तम असेल. अडचणी दूर होतील. 


तुळ- तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. कामाच्या व्यापात बढती मिळण्याची संधी आहे. इतरांकडून काम करवून घ्याल. आजचा दिवस चांगला असेल. 


वृश्चिक - दिवस चांगला आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. विटार करून महत्त्वाचे निर्णय घ्या. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. 


धनु- शेअर बाजारात विचापूर्वक गुंतवणूक करा. वरिष्ठांसोबत थोडं सावधगिरीने बोला. एखादं खास काम पूर्ण होईल. दिवस शांततापूर्ण असेल. 


मकर- तुमचं काही बाबतीत नुकसान होईल. दिखाव्यापासून दूर राहा. कुटुंबात आर्थिक कारणांवरुन काही अडचणी येतील. जास्तीची जबाबदारी मिळेल. 


कुंभ- करिअरच्या दृष्टीने एखादी चांगली संधी मिळेल. शत्रूंवर तुमचं वर्चस्व असेल. काही गोष्टींमध्ये तुम्ही अडकाल. आरोग्याची काळजी घ्या. आज नव्या लोकांना भेटण्याचा योग आहे. 


मीन- करिअरच्या दृष्टीने काही संवेदनशील निर्णय घ्याल. विचारपूर्वक गुंतवणूक करा. आज गरजेपेक्षा जास्त थकवा येईल. आरोग्याची काळजी घ्या.