आजचे राशीभविष्य | सोमवार | ०२ सप्टेंबर २०१९
... असा आहे तुमच्या आजचा दिवस
मेष- नवं ऑफिस किंवा घर खरेदी करण्याची इच्छा असेल. कामामुळे प्रवासाचा योग होऊ शकतो. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्याना पुढे वाटचाल करण्यासाठी वरिष्टांच्या सल्ल्याची गरज भासेल. कामकाजात सुधारणा होईल. जीवनसाथी कडून काही भेट मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.
वृषभ- आज तुम्हाला थकवा आणि आळस जाणवेल. कामाच्या बाबतीत कोणतीही भिती मनात ठेऊ नका. जुन्या कामांचा मागोवा नक्की घ्या. कोणत्या खास व्यक्तीबद्दल अधिक माहिती मिळेल. परिस्थितीनुसार पैश्यांची व्यवस्था करा. विवाहीत लोकांसाठी दिवस चांगला आहे.
मिथुन- व्यवसायात मित्रांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. रोजच्या कामांसाठी दिवस चांगला ठरू शकतो. तुमच्या क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गोष्टींमध्ये बदल करण्याची गरज आहे. सपंत्तीच्या कामांमध्ये अधिक रस निर्माण होऊ शकतो.
कर्क- रोजच्या कामात मन रमणार नाही. मनाल्या काही गोष्टींमुळे निराश होण्याची शक्यता आहे. भावना आणि रागावर ताबा ठेवा. अतीउत्साहामुळे कामं बिघडण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. पुढे जाण्यासाठी सतत कार्यशील राहा. प्रेमी युगूलांसाठी दिवस चांगला आहे.
सिंह- ऑफिसमधील वाद-विवादांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. वरिष्ट तुमच्या कामावर प्रभावित राहतील. सोबत काम करणाऱ्यांकडून मदत मिळेल. व्यवसायात लाभदायक सौदे होण्याची शक्यता आहे. महत्वाच्या कामांवर विशेष लक्ष द्या. विचार केलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कन्या- नोकरीत वायफळ कामात अडकण्याची शक्यता आहे. चांगल्या यशासाठी कठोर मेहनत घेण्याची गरज आहे. विचार करून नोकरी बदलण्याचा निर्णय घ्या. छोट्या-मोठ्या वादांमुळे मूड खराब होऊ शकतो. वैवाहिक जीवन चांगले असेल. प्रेम संबंधांमध्ये यश प्राप्त होण्याची शक्यता आहे.
तुळ- व्यापार करणाऱ्यांसाठी दिवस उत्तम आहे. साथीदारासह वेळ व्यतीत कराल. नोकरी आणि व्यावसायात महत्वाची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. संपत्तीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल.
वृश्चिक- अधिक मेहनत करण्याची गरज आहे. त्याचे फळही चांगले मिळेल. व्यापारात लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. तणाव दूर होतील. साथीदारासह बाहेर फिरण्याचे योग आहेत.
धनु- ऑफिसमध्ये कामाचे प्रमाण अधिक असेल. जुन्या समस्या मार्गी लागतील. स्वत:कडे लक्ष द्या. नवीन कपड्यांची खरेदी होऊ शकते. नवीन कल्पना सुचतील. उत्पन्न आणि खर्चाकडे लक्ष द्यावे लागेल. मित्रांची मदत मिळेल.
मकर- व्यवसायात आणि नोकरीमध्ये कुटुंबाकडून मदत मिळेल. यश सहजरित्या मिळणे अशक्यच आहे. जूने आजार डोकंवर काढू शकतात. नेहमीच्या कामांमध्ये मदत मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही गोष्टीवर तात्काळ निर्णय घेऊ नका. त्यामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. नुकसान होण्याची शक्यता आहे.
कुंभ- विचार केलेले काम पूर्ण न झाल्यामुळे दुखी होऊ शकता. आज धन हानी होण्याची शक्यता आहे. तनाव आणि धावपळीचा दिवस असेल. जास्त काम कराल. पण फायदा कमी होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वरिष्ट सदस्याचे आरोग्य खालावेल.
मीन- व्यापारासंबंधी तणाव वाढेल. सावधान राहण्याची गरज आहे. सहकार्यांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. जूने आजार डोकंवर काढू शकतात. नुकसान झाल्याची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कोणतेही नवीन काम हाती घेऊ नका.