राशीभविष्य ७ जानेवारी : `या` राशीच्या लोकांना मिळणार प्रेमात यश
काय म्हणतेय तुमची रास
मेष- धन लाभ होण्याची शक्यता आहे. शत्रूंवर विजय प्राप्त करू शकता. ऑफिसमध्ये जास्त मेहनत करावी लागेल. नोकरीत प्रगतीचे योग आहेत. तुमचा आत्मविश्वास वाढेल. दिवस चांगला जाईल.
वृषभ- तुमच्या बोलण्याचा प्रभाव लोकांवर पडू शकतो. तुमचं मत इतरांना पटेल. कुटुंबाकडून समर्थन आणि मदत मिळेल. लांब असलेल्या व्यक्तिंसोबत चर्चा होईल. जूने वाद मिटण्याची शक्यता आहे.
मिथुन- व्यापार आणि नोकरीमध्ये फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक काम करा. प्रतीपथावर वाटचाल कराल. तुमच्या भावनांचा आदर केला जाईल. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
कर्क- पूर्ण लक्ष करियरकडे केंद्रीत कराल. सामाजिक कार्यक्रमात उपस्थित रहाल. मित्रांसोबत वेळ व्यतीत कराल. दिवस सामान्य आहे. चांगल्या घटना घडतील. जीवनात सकारात्मक गोष्टी घडतील.
सिंह- सामाजिक कामात यशस्वी राहाल. कठीण परिस्थित कुटुंबाचं आणि मित्र परिवाराकडून मदत मिळेल. वेळ चांगली आहे. मन प्रसन्न राहील. आर्थिक अडचणी दूर होतील. नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.
कन्या- नोकरी आणि व्यापाराच्या बाबतीत भावनांच्या आधारे जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका. वादांमध्ये अडकाल. जुने वाद पुन्हा डोकं वर काढतील. कौटुंबीक समस्या वाढतील. वाहनांचा सावधगिरीने वापर करा.
तुळ- कामं थांबणार नाहीत. तुमच्याकडून लोकांना अधिक अपेक्षा आहेत. दुसऱ्यांच्या गरजांना पूर्ण कराल. आर्थिक परिस्थित सुधारणा होतील. दिवस चांगला आहे.
वृश्चिक व्यवसाय चांगला चालेल. तुमचं एखादं अतिशय महत्त्वाचं काम पूर्ण होईल. आरोग्य उत्तम असेल. व्यक्तिगत प्रश्न निकाली निघतील. गुंतवणूकीच्या योजना आखाल.
धनु- परिवारामध्ये सुखशांती वाढेल. कार्यक्षेत्रात नवे करार होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात सन्मान मिळेल. सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. कोणत्या चांगल्या मित्राशी ओळख होण्याचे योग आहेत.
मकर- व्यापार आणि नेकरीमध्ये चांगल्या गोष्टी घडतील. महत्त्वाच्या विषयावर कुटुंबात चर्चा होईल. ऑफिसच्या कामांमध्ये व्यस्त राहाल. काही नवीन जबाबदाऱ्या खांद्यावर घ्याव्या लागतील. गुंतवणूक करण्याआधी वरिष्ठांचा सल्ला घ्या.
कुंभ- जूनं नातं अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे. दुऱ्यांना मदत केल्याचा आनंद आणि फळ मिळेल. धन लाभ होण्याची शक्यता आहे. वडिलांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसच्या कामांमध्ये मदत मिळेल.
मीन- जीवनात काही महत्त्वाचे सकारात्मक बदल घडतील. अडचणी कमी होतील. अनेक कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील कामाचे प्रमाण जास्त असेल. काही नवीन करण्याची इच्छा आहे. प्रेम प्रकरणात यशस्वी राहाल.