मेष - कुटुंब आणि भावंडांची मदत मिळेल. नवी कामं सुरू करावी लागतील. विचारात असणारी कामंही पूर्णत्वास जातील. संपत्तीच्या कामकाजावर लक्ष द्या. पराक्रम वाढू शकेल. काही महत्त्वाच्या कामांचे बेत आखाल. जबाबदारीवर लक्ष ठेवा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- नकारात्मक गोष्टीत अडकलात तर एखादी महत्त्वाची संधी गमावून बसाल. कोणताही निर्णय घेऊ नका, कोणतीही गोष्ट निकाली काढू नका. विचारपूर्वक बोला. इतरांचं म्हणणं ऐकाल यावर लक्ष ठेवा. साथीदारासोबत वाहन चालवतेवेळी लक्ष द्या. आरोग्य चांगलं राहील. 


मिथुन- नवी काम आणि व्यवसायाचे नवे करार समोर येतील. अडचणींवर मात करण्यासाठी दिवस चांगला आहे. कामं लवकरात लवकर पूर्ण होतील. रोजची कामं पूर्ण होण्यात काहीच अडचणी येणार नाहीत. महत्त्वाच्या भेटीगाठींसाठी आजचा दिवस चांगला आहे. 


कर्क- प्रेमसंबंधांमध्ये काही गैरसमज निर्माण होतील. कोणत्याही बाबतील बेजबाबदार राहू नका. नोकरी किंवा व्यवसायात घाई करु नका. जास्त मेहनत करावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. 


सिंह- विटारात असणारी कामं पूर्ण होणार नाहीत. अनेक विचांरमध्ये मन गुंतलेलं असेल. पैसे सांभाळा. देवाणघेवाण आणि गुंतवणूकीच्या बाबतीत विचार करा. कोणताच बेत आखू नका. रेंगाळलेली कामं पूर्ण करा. कामात मन लागणार नाही, त्यामुळे अडचणी येतील. 


कन्या- व्यवसायात काही नव्या गोष्टींवर कां सुरू होईल. साथीदाराकडून सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधांसाठी आजचा दिवस चांगल असेल. महत्त्वाच्या लोकांशी भेट होईल. कामावर लक्ष द्या. आरोग्य चांगलं राहील. 


तुळ- दिवस चांगला आहे. परिस्थितीचा फायदा घेत कामं पूर्ण करण्याचा प्रत्न करा. कामात मन रमेल. काही चांगल्या संधी मिळतील. आरोग्यही चांगलं असेल. 


वृश्चिक- नोकरी आणि व्यवसायात अचानक काही निर्णय घ्यावे लागतील. काही बाबतील नुकसानही होईल. द्विधा मनस्थिती वाढेल. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत नुकसान होईल. अवाजवी खर्च कमी करा. कामाच्या ठिकाणी काही अडचणी य़ेतील. आरोग्यात चढ उतार असतील. 


धनू- आर्थिक गोष्टी सुधारतील. दाम्पत्य जीनव सुखी असेल. समंजसपणे काही कामं पूर्ण कराल. कर्ज घेण्याचा विचार कराल. काही अडचणी दूर होतील. नव्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल. 


मकर- आजचा दिवस सावध राहा. काही लोक त्यांच्या स्वार्थासाठी तुमच्य़ापुढे अडचणी उभ्या करतील. काही महत्त्वाची कामं आज अपूर्ण राहतील. कामात मन लागणार नाही. 


कुंभ- कामाच्या ठिकाणी स्वत:वर ताबा ठेवा. पदलाभाची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी असणाऱ्या अडचणी दूर होतील. तुम्ही आखलेले बेत यशस्वी होतील. अडकलेली कामं पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या. 


मीन- कामाच्या ठिकाणी काही अडचणी वाढतील. मनात सुरु असणाऱ्या गोंधळामुळे कामातही मन लागणार नाही. नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतील घाई करु नका. धोका पत्करताना काळजी घ्या. जेवण वेळच्या वेळी करा.