Sun Sransit into Virgo : वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांचा राजकुमार सूर्य लवकरच आपलं स्थान बदलणार आहे. सूर्य प्रत्येक राशीत 30 दिवस म्हणजे एक महिना वास्तव करत असतो. सूर्याचं संक्रमण सर्व 12 राशींवर वेगवेगळा परिणाम करतो.  (sun sransit into virgo know will increase bank balance and shine luck Surya Gochar 2023)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यदेव सध्या स्वगृही असून तो 17 सप्टेंबरला दुपारी 01:42 वाजता कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 18 ऑक्टोबरपर्यंत तो कन्या राशीत विराजमान असेल. त्यानंतर तो तूळ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य गोचर तीन राशींच्या लोकांचं आयुष्या सूर्यसारखं चमकवणार आहे. 


धनु (Sagittarius Zodiac)


सूर्य संक्रमण (Surya Gochar 2023) या राशीच्या लोकांसाठी खूप शुभदायक ठरणार आहे. सूर्य गोचरमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे.  व्यवसायात गुंतलेल्या लोकांच्या नफ्यात वाढ होणार आहे. तुमचा आत्मविश्वास महिनाभर शिखरावर असणार आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचं नवीन स्रोत वाढणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. 


सिंह (Leo Zodiac)


या राशीच्या लोकांचा स्वामी सूर्य देव (Surya Gochar 2023) आहे. त्यामुळे सूर्याच्या गोचरमुळे तुमचे भाग्य सूर्यासारखं चमकणार आहे. नवीन काम करणाऱ्या लोकांना हा महिना भाग्यशाली ठरणार आहे. तुम्ही चैनीच्या वस्तू खरेदी करणार आहात. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. तुमच्या आर्थिक स्थिती बदलणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Horoscope Money Weekly : 11 ते 17 सप्टेंबर : सूर्य आणि बुधामुळे या राशींच्या दारी येईल लक्ष्मी! जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य


मेष (Aries Zodiac) 


या राशीच्या लोकांना सूर्य देवाच्या गोचरमुळे (Surya Gochar 2023) तुम्हाला जुनाट आजारापासून आराम मिळणार आहे. तुमचं आरोग्य सुधारणार आहे. समाजात तुमचा मान-सन्मान वाढणार आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. नवीन काम सुरु करण्याचा विचारात असाल तर हा काळ उत्तम असणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Rahu Gochar 2023 : वाईट दिवस संपणार! पापी ग्रह राहुमुळे उत्पन्नात होणार झपाट्याने वाढ


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)