Surya Rahu Yuti 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर आपल्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये अनेकदा ग्रहांचा संयोग देखील होताना दिसतो. सूर्य आणि राहू या दोन्ही ग्रहांचे स्वतःचे विशेष स्थान देण्यात आलं आहे. येत्या काळात सूर्य आणि राहू यांची युती होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्य आणि राहू हे एकमेकांचे शत्रू मानले जातात. 15 मार्च रोजी मीन राशीत सूर्य आणि राहू यांची भेट होणार आहे. या दोन ग्रहांच्या युतीचा सर्व राशींवर काही ना काही परिणाम होणार आहे. सूर्य आणि राहूच्या संयोगाने व्यवसायात लाभ होईल. संपत्ती वाढते आणि जीवनात सुख, आनंद येणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात लाभ मिळू शकणार आहे. 


कन्या रास


कन्या राशीच्या लोकांसाठी ग्रहांची युती खूप शुभ राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. मानसिक तणाव दूर होणार आहे. तुमच्या कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. काही मोठा प्रकल्प तुमच्या वाट्याला येऊ शकतो. यावेळी नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. 


मकर रास


मकर राशीच्या लोकांवर सूर्य आणि राहूच्या युतीचा शुभ प्रभाव पडू शकणार आहे. यश आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. पद आणि प्रतिष्ठा वाढेल. नशीब तुमच्या बाजूने असेल. बेरोजगारांना नोकरीची नवीन संधी मिळणार आहे. या राशीच्या लोकांना अधिक पैसे मिळविण्यात यश मिळेल. 


वृषभ रास


सूर्य आणि राहूच्या युतीचा वृषभ राशीच्या लोकांवर देखील सकारात्मक प्रभाव पडणार आहे. या काळात तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. मेहनतीने केलेल्या कामात यश मिळेल. तुमच्या जोडीदारासोबतचे नाते टिकवण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. यावेळी तुमचं काम आणि व्यवसाय चांगलं चालणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)