Solar and Lunar eclipse 2023: ऑक्टोबर महिना हा धार्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. कारण या महिन्यात सूर्य ग्रहण आणि चंद्र ग्रहण दोन्ही दिसणार आहेत. सूर्य ग्रहण 14 ऑक्टोबर शनिवारी सर्वपित्रअमावस्येला लागणार आहे तर, त्यानंतर 15 दिवसांनंतर चंद्र ग्रहण 28 ऑक्टोबर रोजी दिसणार आहे. वर्षातील दुसरे चंद्र व सूर्य ग्रहण भारतातून दिसणार की नाही हे जाणून घेऊया. 


2023मधील दुसरे सूर्यग्रहण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

14 ऑक्टोबर रोजी या वर्षातील दुसरे सूर्य ग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 34 मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री 02 वाजून 25 मिनिटांनी संपणार आहे. भारतातून हे ग्रहण दिसणार नाहीये. त्यामुळं भारतावर त्याचा विशेष परिणाम होणार नसून त्याचा सूतक काळही वैध राहणार नाहीये. 


कुठे दिसेल सूर्यग्रहण


14 ऑक्टोबर रोजी लागणारे सूर्यग्रहळ भारतात दिसणार नाहीये. वर्षातील दुसरे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिकेतील काही शहरांव्यतिरिक्त उत्तर अमेरिकेतील कॅनडा, ब्रिटिश वर्जिन, आयलँड, ग्वाटेमाला, मैक्सिको, अर्जेटिना, कोलंबिया, क्यूबा, बाराबाडोस, पेरु, उरुग्वे, एंटीगुआ, वेनेजुएला, जमैका, हैती, पराग्वे, ब्राझील, डोमिनिका, बहामास सारख्या शहरांत दिसणार आहे. 


चंद्रग्रहणात भारतात सूतक काळ वैध आहे का?


वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री लागणार आहे. हे ग्रहण 29 ऑक्टोबर रोजी रात्री 1 वाजून 5 मिनिटांनी सुरू होऊन रात्री 2 वाजून 24 मिनिटांनी संपणार आहे. हे पूर्ण चंद्रग्रहण असणार असून भारतातून दिसणार आहे. त्यामुळं याचा सूतक काळदेखील मान्य असणार आहे. भारताव्यतिरिक्त युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, अफ्रिका, नॉर्थ अमेरिका, उत्तर व पूर्व दक्षिण अमेरिका, अटलांटिक महासागर, हिंद महासागर आणि अंटार्टिकामध्ये दिसणार आहे. मेष रास आणि अश्विनी नक्षत्रात ग्रहण लागणार आहे. 


चंद्रग्रहणाचे वेध 9 तास आधीपासूनच सुरू होणार आहे. याकाळात कोणतेही शुभ कार्य व पूजापाठ केले जात नाहीत. 27 ऑक्टोबरच्या मध्यरात्री ग्रहण लागणार असून ग्रहणाचे वेध 28 ऑक्टोबरला संध्याकाळी 4 वाजून 5 मिनिटांनी सुरू होणार आहेत. 


सूर्यग्रहणाचा कोणत्या राशींवर पडणार प्रभाव? 


ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य ग्रहण भारतातून दिसणार नसले तरी त्याचा प्रभाव सर्व राशींवर पडतो. या दरम्यान काही राशींच्या व्यक्तींना सावध राहण्याची गरज आहे. मेष, कर्क, तुळ आणि मकर या राशींनी सूर्यग्रहणाच्या वेळी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. 


चंद्रग्रहणाचा कोणत्या राशीवर प्रभाव पडणार?


वर्षातील सर्वात शेवटचे चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण मेष, वृषभ, कन्या आणि  मकर राशींसाठी अशुभ मानले जाते. त्याचबरोबर मिथुन, कर्क, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी शुभ मानले जाते. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )