Surya Gochar 2023 : ग्रह वेळोवेळी त्यांचं स्थान बदलत असतात. त्यांच्या या हालचालींचा सर्व राशींवर परिणाम होतो. ज्योतिष शास्त्रामध्ये, भगवान सूर्य हा आत्म्याचा कारक मानला आहे. भगवान सूर्य दर महिन्याला राशी बदलतात ज्याला सूर्य संक्रांत असंही म्हटलं जातं. त्यानुसार भगवान सूर्य 14 एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष ही सूर्याची उच्च रास मानली जाते, त्यामुळे यामध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतात. सूर्य 14 मे पर्यंत या राशीत राहणार असून त्यानंतर तो वृषभ राशीत जाणार आहे. सूर्य देवाच्या या राशीत बदलामुळे अनेक राशींना खूप फायदा होणार आहे. आज जाणून घेऊया की, सूर्याच्या परिवर्तनामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे. 


सिंह रास


या राशीच्या व्यक्तींसाठी हे परिवर्तन फलदायी ठरणार आहे. सूर्य मेष राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर सिंह राशीच्या लोकांचे चांगले दिवस येतील. या काळामध्ये कुटुंबाकडून तुम्हाला अपेक्षित सहकार्य मिळणार आहे. तसंच या राशीच्या राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील. तुम्ही जो काही व्यवसाय करत असाल त्यामध्ये तुमची प्रगती होणार आहे. आर्थिक स्थिती चांगली सुधारणार आहे.


कर्क रास


या राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य गोचर अनुकूर असणार आहे. कर्क राशीच्या व्यक्तींना मेष म्हणजे सूर्य उच्च राशीत येण्यापासून भरपूर मोठा फायदा होणार आहे. व्यवसायापासून ते करिअरपर्यंत हे गोचर या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळामध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना नोकरी मिळणार आहे. तुमच्या बिझनेसमध्येही तुम्हाला उत्तम फायदा मिळण्याची शक्यता आहे. 


मिथुन रास


या राशीच्या व्यक्तींना या काळामध्ये खूप मान मिळणार आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे गोचर खूप फलदायी ठरणार आहे. या काळामध्ये या राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होऊ शकते. इतकंच नाही तर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होणार आहेत. जमीन खरेदी करायची असल्यास तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. अचानक आर्थिक लाभ मिळणार आहे.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)