Surya Budh Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात बुधादित्य राजयोग अतिशय शुभ मानला जातो. ग्रहांचा राजा सूर्यदेव सध्या वृषभ राशीत आहे. आता सूर्य ग्रह 15 जून 2023 ला मिथुन राशीत प्रवेश (surya gochar 2023) करणार आहे. त्यापूर्वी 7 जून 2023 ला ग्रहांचा राजकुमार बुध वृषभ राशीत विराजमान झाला आहे. त्यामुळे वृषभ राशीत बुधादित्य राजयोग जुळून आला आहे. दुसरीकडे गुरू आणि चंद्र मकर राशीत आहे. त्यामुळे गुरू -चंद्राचा संयोगामुळे गजकेसरी योगदेखील (Gajkesari Yog 2023) तयार झाला आहे. (Sun Transit 2023) 


कर्क (Cancer)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्क राशीच्या कुंडलीत बुधादित्य हा शुभ योग तयार होत आहे. सुख समृद्धी, मान सन्मानासोबत धनलाभ या राशीच्या लोकांना होणार आहे. परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. उत्पन्न वाढण्याचे संकेत आहे.  (Surya gochar 2023 budhaditya rajyog formed luck of 5 zodiac signs)


कन्या (Virgo)


या राशीच्या लोकांना बुधादित्य राजयोग धनलाभ घेऊन आला आहे. नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत. कुटुंबात शुभ कार्य ठरणार आहे. स्पर्धा परीक्षे देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा योग शुभ ठरणार आहे. 


मिथुन (Gemini)


बुध हा मिथुन राशीचा स्वामी असणाल्याने या राजयोगाचा त्यांना मोठा लाभ होणार आहे. परदेशातून शुभ संकेत मिळणार आहे. खास करुन ज्यांचे काम परदेशाशी संबंधित आहे त्यांना अधिक लाभ होणार आहे. आर्थिक फायदा होण्याची दाट शक्यता आहे. 


मेष (Aries)


या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग अतिशय लाभदायक ठरणार आहे. अचानक धनलाभाचे योग आहेत. अनेक महिन्यांपासून अकडलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहे. तुमचं बँक बँलेन्स वाढणार आहे. प्रवासाचे योगही जुळून आले आहेत.


सिंह (Leo)


या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग अतिशय शुभ सिद्ध होणार आहे. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे.  उत्पन्नाची स्त्रोत वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपविण्यात येणार आहे. नवीन नवीन नोकरीची ऑफर तुम्हाला मिळणार आहे. बिझनेस करणाऱ्यांसाठी हा राजयोग अतिशय शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )