Surya Grahan 2023 : वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण कोणत्या राशीला घातक?
Surya Grahan 2023 Date : या वर्षीत एकूण 4 ग्रहणं येणार आहेत. ग्रहणाचा काळ हा चांगला नसतो असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. अशातच वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे काही राशींच्या लोकांसाठी क्लेशदायक ठरणार आहे.
Surya Grahan Bad Effect 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह, तारे आणि ग्रहण यामध्ये होणारे बदल हे आपल्या आयुष्यात चांगला वाईट काळ घेऊन येतं असतो. काहीसाठी हा छप्पडफाड शुभदायी असतो तर काहींसाठी मरेण यातने एवढी संकट घेऊन येतो. यावर्षी 2023 मध्ये एकूण 4 ग्रहण होणार आहेत. या ग्रहाणांचाही प्रभाव सर्व 12 राशीच्या लोकांच्या आयुष्यावर दिसून येतो. यंदा 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण असणार आहेत. पण वर्षाचं पहिलं ग्रहण हे काही राशींसाठी संकटाचा काळ घेऊन येणार आहे.
कधी आहे पहिलं ग्रहण?
या वर्षाचं पहिलं ग्रहण हे 20 एप्रिलला असणार आहे. हे ग्रहण सकाळी 07.04 वाजता सुरु होईल आणि दुपारी 12.09 पर्यंत राहील. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. पण त्याचा वाईट परिणाम काही राशींच्या लोकांवर दिसून येणार आहेत. (surya grahan 2023 first solar eclipse of year Capricorn Scorpio Virgo Leo Virgo these zodiac sign People Bad Effect marathi news)
'या' राशींवर होणार वाईट परिणाम
मेष (Aries)
ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्यग्रहण होईल, त्या वेळी सूर्य मेष राशीत असणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमची अनेक महत्त्वाची कामं रखडतील. कुटुंबात अशांततेचं वातावरण राहील. या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेच आहे. सूर्यग्रहणामुळे मेष राशीच्या लोकांच्या आर्थिक समस्या वाढू शकतात. मानसिक तणावाचाही सामना करावा लागू शकतो, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
सिंह (Leo)
या राशीच्या लोकांची कामं बिघडतील. या राशीच्या लोकांना अनेक चढ-उतारांना सामोरं जावं लागणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात रस वाटणार नाही.
कन्या (Virgo)
कन्या राशीच्या लोकांच्या कुंडलीच्या 8 व्या घरात होणारे सूर्यग्रहण मानसिक त्रास देणार ठरणार आहे. या काळात तुमचा रागावर नियंत्रण राहणार नाही. तुम्हाला डोकेदुखीच्या समस्येतूनही जावं लागू शकतं. काही गोष्टींची काळजी घेतल्यास फायदा होईल. या दरम्यान बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा समस्या वाढू शकतात. शिवाय प्रवास टाळा अन्यथा तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यातील शत्रूंची संख्या वाढणार आहे.
वृश्चिक (Scorpio)
वृश्चिक राशीच्या सहाव्या घरात सूर्यग्रहण होणार आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांनी शत्रूंपासून सावध राहिला पाहिजे असा इशारा ज्योतिषशास्त्रात देण्यात आला आहे. या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्या. शिवाय अपघात होण्याची भीती शास्त्रात वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे लांबचा प्रवास टाळा. वाहन चालवताना थोडी काळजी घ्या.
मकर (Capricorn)
ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांच्या कुंडलीच्या चौथ्या घरात सूर्यग्रहणाचा परिणाम दिसून येणार आहे. या काळात आईच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवाय तुमचे खर्च वाढणार असून तुम्हाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चामुळे बजेट बिघडणार. तुमच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्या, अन्यथा नुकसान होऊ शकतं.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)