Surya Grahan 2024 : चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण या दोन्ही घटना खगोलशास्त्रीय घटना आहेत. पण ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला अतिशय अशुभ मानलं जातं. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा ग्रहांचा राजा आणि आत्माचा कारक मानला गेला आहे. तर सूर्यदेवाचा आराधनाचा वार हा रविवार असतो. सूर्यग्रहणाचा परिणाम हा जगासह मानवी जीवनावरही होतो. 12 राशींपैकी काहींसाठी तो सकारात्मक ठरतो तर काहींसाठी नकारात्मक ठरतो. या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण कधी आहे जाणून घ्या. (Surya Grahan 2024 First solar eclipse of  this year before Chaitra Navratri These zodiac signs will get benefits)


कधी आहे वर्षातील पहिलं सूर्यग्रहण? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे चैत्र नवरात्रीपूर्वी असणार आहे. सूर्यग्रहण 8 एप्रिलला रात्री 9:12 वाजेपासून 9 एप्रिलला पहाटे 2:22 वाजेपर्यंत असणार आहे, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी सांगितलंय. 


सूर्यग्रहण भारतात दिसणार का?


चंद्रग्रहणानुसारच वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे भारतातही दिसणार नाही आहे. तर हे सूर्यग्रहण पश्चिम युरोप पॅसिफिक, अटलांटिक, आर्क्टिक मेक्सिको, उत्तर अमेरिका (अलास्का वगळता), कॅनडा, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा उत्तरेकडील भाग, इंग्लंडचा वायव्य प्रदेश, आयर्लंड या देशांमध्ये दिसणार आहे. 


'या' राशींसाठी ठरणार सकारात्मक!


वृषभ (Taurus Zodiac) 


वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे या राशीच्या लोकांसाठी चांगल असणार आहे. या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. करिअरमधील अडचणी दूर होणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ व्ययित करणार आहात.


मिथुन (Gemini Zodiac)


या राशीच्या लोकांसाठी वर्षातील पहिलं सूर्यग्रहण सकारात्मक ठरणार आहे. रखडलेली कामं पूर्ण होणार आहे. शिक्षण किंवा नोकरीसाठी तुम्हाला परदेशात जावं लागणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. तुमच्या संपत्ती वाढ होणार आहे. आरोग्य उत्तम असेल. 


कर्क (Cancer Zodiac)   


या राशीच्या लोकांसाठीही वर्षातील पहिलं सूर्यग्रहण चांगला ठरणार आहे. अनेक दिवसांपासून कुटुंबात सुरू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळणार आहे. आयुष्यात अनेक बदल होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे. तणावमुक्त होणार असून घरात आनंदाच वातावरण असणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)