Surya Grahan (Solar Eclipse) Zodiac Sign Effect in Marathi : या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी (Solar Eclipse 2024 Date in India) म्हणजे 2 ऑक्टोबरला असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अशुभ मानलं जातं. ग्रहणाचा परिणाम हा मानवी जीवनावर होतो. त्यामुळे सर्वपित्री अमावस्येला असलेलं सूर्यग्रहण हे काही राशीच्या लोकांसाठी घातक आहे. दसऱ्या दिवाळीच्या तोंडावर काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात आर्थिक संकट कोसळणार आहे. (Surya Grahan Second Solar Eclipse on Sarvapitri Amavasya these Zodiac Sign people there will be financial loss)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, पण प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर याचा परिणाम नक्कीच होणार आहे. अनेक राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात प्रगती तसंच जीवनात अनेक बदल दिसू शकतात. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. मात्र काही राशींवर सूर्यग्रहणाचा विपरीत परिणाम होणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींवर सूर्यग्रहणाचा नकारात्मक प्रभाव पडणार आहे. 


या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर 2024 रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 9:13 वाजता सुरू होईल आणि 3 ऑक्टोबर रोजी पहाटे 3:17 वाजेपर्यंत असणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की कोणतेही ग्रहण झाले तर त्याचा प्रभाव महिनाभर राहतो. याचा अर्थ तीन राशीच्या लोकांची दसरा दिवाळी ही आर्थिक संकटात जाणार आहे. 


कर्क (Cancer Zodiac)   


या राशीत सूर्य तृतीय स्थानात स्थित आहे. जिथे केतूशी संयोग आहे. अशा परिस्थितीत आत्मविश्वासाचा अभाव दिसून येतो. छोट्या-छोट्या कामातही तुम्हाला कोणत्या ना कोणत्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. भावा-बहिणींसोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो आणि तुम्ही खूप मानसिक तणावाखाली असाल. त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी स्वत:वर थोडे नियंत्रण ठेवा. तुमच्या छोट्याशा कामात जास्त मेहनत घ्यावी लागेल. यानंतरच तुम्ही यश मिळवू शकता. आर्थिक नुकसान होण्याची चिन्हे आहेत.


तूळ (Libra Zodiac)  


तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण अनेक समस्या निर्माण करू शकते. या राशीमध्ये सूर्य आणि केतू बाराव्या भावात स्थित असतील. अशा परिस्थितीत या राशीचे लोक अनावश्यक खर्चामुळे त्रस्त होऊ शकतात. जीवनात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. व्यवसायातही काही अडचणी येऊ शकतात. यासोबतच डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. प्रवासात थोडी काळजी घ्यावी लागेल कारण अपघात होण्याची शक्यता आहे. करिअरवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही थोडे तणावात राहू शकता. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुम्ही परदेश दौऱ्यावर गेला असाल तर थोडे सावध राहा, कारण ते तुमच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते.


मकर (Capricorn Zodiac)   


या राशीमध्ये सूर्य आणि केतू यांचा संयोग नवव्या भावात होत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळत नाही. प्रत्येक कामात विलंब आणि अडथळे येऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही थोडे नाराज होऊ शकता तसेच चिडचिड आणि रागावू शकता. व्यवसायातही नुकसान होऊ शकते. त्यामुळे पैशाशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नक्कीच सल्ला घ्या. न्यायालयीन प्रकरणांमध्ये तुम्ही अडकू शकता. अनावश्यक खर्चामुळे त्रास होईल. यासोबतच स्वतःच्या आणि वडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)