Surya Shani Ashubh Yog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठरलेल्या वेळी राशीमध्ये बदल करतो. यावेळी अनेकदा दोन ग्रह एका राशीमध्ये येतात. दरम्यान सूर्य आणि शनि हे एकमेकांचे शत्रू मानले जातात. दोन ग्रहांचा संयोग किंवा त्यांचं एकमेकांवर पडणारी दृष्टी प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या शनि स्वतःच्या राशीत कुंभ राशीत आहे. तर सूर्याने नुकतंच गोचर केलं आहे. मात्र यापूर्वी दोन्ही ग्रह समोरासमोर आले होते. यावेळी अशुभ संयोग निर्माण झाला होता. पण 17 सप्टेंबरला सूर्याने कन्या राशीत प्रवेश केल्याने शनी आणि सूर्याची दृष्टी एकमेकांवर पडणार नाही. त्यामुळे हा अशुभ संयोग संपुष्टात आला आहे. अशुभ संयोगाच्या समाप्तीमुळे अनेक राशींना फायदा होणार आहे. चला जाणून घेऊया शनी आणि सूर्याचा अशुभ संयोग संपल्यानंतर कोणत्या राशींना विशेष लाभ होणार आहे.


मेष रास 


सूर्य आणि शनीचा अशुभ संयोगही या राशीच्या लोकांपासून दूर झाला आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या जीवनावर विशेष प्रभाव पडू शकतो. तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी काही ना काही मार्ग खुले होऊ शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. पगारदार लोकांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे.


मिथुन रास 


अशुभ संयोग दूर झाल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं पुन्हा सुरळीत सुरू होऊ शकणार आहे. जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाणार आहे. करिअरमध्ये प्रगती आणि उत्पन्नात वाढ करण्याचे आश्वासन मिळणार आहे. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचं कौतुक होईल. या काळात तुम्हाला लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. 


तूळ रास 


तूळ राशीच्या लोकांनाही लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमचे दीर्घकाळ प्रलंबित असलेले स्वप्न पूर्ण होऊ शकते. नशिबाने पूर्ण साथ दिल्याने गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. पैशांचा स्त्रोत वाढणार आहे. व्यवसायातही यश मिळाल्याने अधिक नफा मिळण्याची संधी आहे. नशीब तुमच्या बाजूने राहिल्याने उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडणार आहेत. प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. प्रत्येक कामात यश मिळणार आहे


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)