मुंबई : झोपेत जवळपास आपण प्रत्येकजण स्वप्न पाहतात. यापैकी काही स्वप्न ही भीतीदायक असतात. अनेकवेळा आपण झोपेतून उठल्याबरोबर स्वप्नं विसरून जातो तर कधी कधी स्वप्नात अशा काही गोष्टी दिसतात ज्या आपल्या मनातून बाहेर पडत नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वप्न वाईट असेल किंवा चांगलं त्यामागे नक्कीच काहीतरी अर्थ दडलेला असतो. प्रत्येक स्वप्नाचा एक अर्थ असतो. स्वप्न शास्त्राप्रमाणे, स्वप्नात दिसणार्‍या अनेक गोष्टी ज्या तुमच्या भविष्याविषयी माहिती देतात. मात्र स्वप्नात अशा काही गोष्टी दिसतात ज्याचा अर्थ अनेकदा आपल्याला समजत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच स्वप्नातील गोष्टींचा अर्थ सांगणार आहोत.


हिरवगार शेत दिसणं


काहींना स्वप्नात शेत हिरवं शेत दिसतं. दरम्यान हिरवी शेतं चांगलं भविष्य दर्शवत. याचा अर्थ असा की, तुमच्या जीवनातील धन आणि संपत्तीशी संबंधित समस्या संपणार आहे. या स्वप्नाचा अर्थ म्हणजे लवकरच तुमच्याकडे कुठूनतरी पैसा येणार आहे.


लहान मूल


स्वप्न शास्त्राप्रमाणे, जर तुम्हाला स्वप्नात एखादं लहान मूल दिसलं तर याचा अर्थ असा होतो की, तुम्ही काही रखडलेलं काम पूर्ण करणार आहात. कदाचित या कामामुळे तुमच्या घरात खूप पैसा येईल.


एखाद्या व्यक्तीला रडताना पाहणं


जर तुम्ही स्वप्नात एखादी व्यक्ती रडत असताना पाहिली असेल तर समजून घ्या की तुमची प्रगती होणार आहे. हे एक शुभ चिन्ह मानलं जातं. 


घाण दिसणं


तुम्ही स्वप्नात घाण पाहिली असेल तर ते स्वप्न नक्कीच तुमचा मूड खराब करेल. परंतु तुम्हाला माहितीये का हे खूप शुभ संकेत मानले जातात. स्वप्न शास्त्रानुसार, कुठून तरी भरपूर पैसे येणार आहे.


(वरील माहिती सर्वसामान्य समजुती आणि संदर्भांच्या आधारे उपलब्ध झाली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)