मुंबई : स्वप्नाचा अर्थ स्वप्न शास्त्रात सविस्तरपणे सांगण्यात आला आहे. स्वप्नात देवता किंवा त्यांच्याशी संबंधित कोणतीही वस्तू दिसली तर ते खूप शुभ मानलं जातं. स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात शिवलिंग दिसलं तर याचा अर्थ तुमच्या सर्व समस्या संपणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहुतेक शिवभक्त शिवलिंगाचं स्वप्न पाहतात. पण स्वप्नात शिवलिंग दिसण्याचा अर्थ नेमका काय हे जाणून घेऊया.


स्वप्नात शिवलिंग पाहण्याचा अर्थ


स्वप्न शास्त्रानुसार, शिवलिंगाचे स्वप्न पाहणं म्हणजे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार आहे. तुमच्या सर्व संकटांचा अंत होणार आहे. स्वप्नात शिवलिंग पाहणं म्हणजे तुमच्या आयुष्यात काहीतरी शुभ घडणार आहे. जे लोक स्वप्नात शिवलिंग पाहतात ते खूप भाग्यवान मानले जातात.


पुर्नजन्माशी संबंध


स्वप्नात शिवलिंग पाहणे देखील पूर्वजन्माशी संबंधित मानलं जातं. शिवलिंग पाहणं म्हणजे तुम्हाला तुमच्या कर्मानुसार सुख आणि दु:ख मिळालं आहे आणि आता तुमच्या सर्व अडचणी संपणार आहेत. शिवलिंगाचं दर्शन होणं म्हणजे या वेळेपासून तुमच्या प्रगतीचा काळ सुरू होणार आहे.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)