मुंबई : स्वप्नांची दुनिया खूप मायावी मानली जाते. आपण अनेकदा स्वप्नात अशा गोष्टी पाहतो ज्यांचा आपण विचारही केला नाही. अनेकदा आपण स्वप्नात ज्या काही गोष्टी पाहतो, त्या आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे संकेत देतात. कधीकधी हे संकेत चांगल्यासाठी असतात तर काही वेळा हे संकेत नुकसानीची स्थिती दर्शवतात. चला तर मग आज जाणून घेऊया जर एखाद्याला स्वप्नात सोनं आणि चांदी दिसली तर ते कशाचे संकेत आहेत.


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    स्वप्न शास्त्रानुसार, जर एखाद्याला स्वप्नात सोन्या-चांदीचे दागिने दिसले तर याचा अर्थ असा होतो की, आगामी काळात तुमचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे अशी स्वप्नं पाहिल्यानंतर खर्च करताना थोडा विचार करा.

  • जर तुम्हाला स्वप्नात चांदीचं सोन्यामध्ये रूपांतर झालेलं दिसलं तर असं स्वप्न खूप फलदायी आहे. अशा प्रकारचं स्वप्न व्यवसायात वाढीचं लक्षण मानलं जातं.

  • स्वप्नात सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेलेलं पाहणं शुभ लक्षण मानलं जात नाही. जेव्हा तुम्हाला असं स्वप्न पडतं तेव्हा तुम्ही सावध असणं आवश्यक आहे. अशी स्वप्नं पाहण्याचा अर्थ असा आहे की, व्यवसाय किंवा नोकरीतील तुमचे विरोधक तुमच्या विरोधात कट रचू शकतात किंवा तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत असतील.

  • अनेक वेळा तुम्ही स्वप्नात सोन्याचे दागिने घातलेले पाहिले असेल. स्वप्न शास्त्रानुसार, असं स्वप्न पाहणं चांगलं लक्षण नाही. अशी स्वप्ने पाहण्याचा अर्थ असा आहे की, आगामी काळात जवळच्या व्यक्तीशी तुमचं नातं बिघडू शकतं.

  • अनेक वेळा स्वप्नात चांदी दिसली तर स्वप्न शास्त्रानुसार, अशी स्वप्नं दिसणं आर्थिक संकट दर्शवतं. म्हणजेच आगामी काळात तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.


(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे)